पुणे मुंबई महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; दृश्य CCTVमध्ये कैद!

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा जवळ कंटेनरचा भीषण अपघात
अपघात
अपघातदिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर (Pune Mumbai Highway) खंडाळा (Khandala) येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. अपघातात कंटेनर पलटी होऊन थेट रिक्षाला धडक दिली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला. (Accident On Pune Mumbai Highway)

अपघात
Union Budget Reactions: आजचा अर्थसंकल्प म्हणजे भारताला आत्मनिर्भर आणि बलशाली बनविणारा- फडणवीस

मुंबईकडून (Mumbai) पुण्याकडे (Pune) येणारा एक भरधाव कंटेनर खंडाळा येथे वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पलटी झाला. त्यानंतर हा कंटेनर सुमारे पंधरा ते वीस फूट फरफटत गेला. या अपघाताचा सर्व थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला. (Pune News In Marathi)

हे देखील पहा-

खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाला या कंटेनरची जोरदार धडक बसली. यात रिक्षामध्ये असलेल्या तीन महिला आणि रिक्षा चालक जखमी झाले आहेत. जखमींवर लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com