PM Modi US Visit : भारताबद्दल अख्ख्या जगाला विचारा; अमेरिका दौऱ्याआधी PM मोदींची मुलाखत, बऱ्याच मुद्द्यांवर रोखठोक बोलले

PM Narendra Modi News : अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली.
PM Modi US Visit
PM Modi US Visit SAAM TV
Published On

PM Narendra Modi On UNSC Membership : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कार्यप्रणालीतील सुधारणांच्या मुद्द्यावर भारताकडून अनेक वर्षांपासून आवाज उठवला जात आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश या नात्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य केले जावे, अशी भारताची मागणी आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही देशाच्या वतीने तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मोदींनी मंगळवारी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला. (Latest Marathi News)

PM Modi US Visit
Narendra Modi America Visit: यूएनमध्‍ये योग, जो बायडन यांच्या सोबत डिनर... असा असेल PM मोदींचा संपूर्ण दौरा

अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुलाखत दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील (UNSC) सध्याच्या सदस्यत्वाचे मूल्यांकन झाले पाहिजे. भारताला त्या ठिकाणी बघायचे आहे का, असं जगभरातील देशांना विचारलं पाहिजे, असे मोदी म्हणाले.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सध्याच्या घडीला पाच स्थायी सदस्य आहेत. त्यात अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स आणि रशिया या देशांचा समावेश आहे. याशिवाय दहा अस्थायी सदस्य आहेत. त्यात भारताचाही समावेश आहे. (India-US meet)

PM Modi US Visit
Gita Press Awarded: गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं; काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतासारख्या (India) देशाची गरज आहे, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्राचे प्रमुख साबा कोरोसी यांनी केले होते. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच कोरोसी यांनी हे विधान केले होते. सुरक्षा परिषदेत उत्तम प्रतिनिधींची आवश्यकता आहे, असे सदस्य देशांनाही वाटतं, असेही ते म्हणाले होते.

जो बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

पंतप्रधान मोदींच्या चार दिवसीय दौऱ्याची सुरुवात २१ जूनपासून होणार आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत चर्चा करतील. अमेरिकी संसदेतील संयुक्त सभेला ते संबोधित करणार आहेत. मोदी पहिल्यांदाच संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com