पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शनिवारी इटानगर येथील कार्यक्रमात विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. मोदींचं कुटुंब नेमकं कोणतं आहे, अशी विचारणा करणाऱ्या विरोधी पक्षांना मोदींनी कडक शब्दांत इशारा दिला. 'कान खोलकर सुन लो... अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक व्यक्ती ही मोदींचं कुटुंब (मोदी का परिवार) आहे,' असं प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिलं. घराणेशाही असलेले लोक केवळ स्वतःच्या कुटुंबाचाच फायदा बघतात, असा घणाघातही त्यांनी केला. (Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शनिवारी इशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी ५५,६०० कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यात जगातील सर्वात लांब सेला बोगद्याचाही ( Sela Tunnel) समावेश आहे. मोदींनी इटानगर येथील कार्यक्रमात मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशातील विविध योजनांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं.
जवळपास ८२५ कोटी रुपये खर्चून अरुणाचल प्रदेशात बालीपारा-चारीद्वार-तवांग मार्गावर सेला बोगदा (Sela Tunnel News) बांधला आहे. कोणत्याही परिस्थितीत, कुठल्याही मोसमात अरुणाचल प्रदेश ते तवांगपर्यंतची दळणवळणाची सुविधा या बोगद्यामुळं सुरूच राहील. २०१९ मध्ये या बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मोदींनी अरुणाचल प्रदेश राज्य परिवहन विभागाच्या एका बसला हिरवा झेंडा दाखवून सेला बोगद्याचं उद्घाटन केलं.
इटानगरमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, २०१९ मध्ये सेला बोगद्याचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती आणि आज त्याचं लोकार्पण झालं आहे. २०१९ मध्येच डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटनही झालं होतं. आज हे विमानतळ सेवेत आहे, असंही मोदींनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. एकीकडे आम्ही विकसित भारताच्या निर्माणासाठी आणि तरुणांच्या उत्तम भवितव्यासाठी काम करत आहोत. दुसरीकडे इंडिया आघाडीचे घराणेशाही असलेले नेते माझ्यावर हल्ले करत आहेत. मोदींचे कुटुंब कोणते, अशी विचारणा मला विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. त्यांनी कान उघडून नीट ऐकावे. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) प्रत्येक व्यक्ती मोदीचं कुटुंब आहे. इथं राहणारा प्रत्येक माणूस मोदीचं कुटुंब आहे. हे घराणेशाहीतील लोक केवळ आपल्या कुटुंबाचा फायदा बघतात, असा आरोपही मोदींनी केला.
भाजप देशाच्या विकासासाठी काम करत आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी काय काम करतात हे सर्व लोकांना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घोटाळ्याचा आरोप केला. देशाच्या सीमेवर अत्याधुनिक यंत्रणा उभारायची होती त्यावेळी काँग्रेसचे सरकार घोटाळे करण्यात व्यस्त होते. देशाच्या सुरक्षेकडे ते दुर्लक्ष करत होते, असंही मोदी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.