Modi ki Guarantee नव्हे हा तर चुनावी जुमला, गॅस दरकपातीवरुन काॅंग्रेस आमदारांची पंतप्रधानांवर टीका

LPG Price :गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या निर्णयावर समाज माध्यमातून देखील माेदी विराेधक टीका करु लागले आहेत.
congress mla criticise pm modi on lpg gas cylinder price cut by rs 100
congress mla criticise pm modi on lpg gas cylinder price cut by rs 100 Saam Tv
Published On

- अमर घटारे / सचिन जाधव

International Women's Day :

जागतिक महिला दिना निमित्त केंद्र सरकारने आज (शुक्रवार) घरगुती गॅस सिलेंडरच्या (domestic gas cylinder) दरात 100 रुपयांनी कपात केली आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय आगामी काळातील लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून घेतल्याची टीका काॅंग्रेस आमदार यांच्यासह अन्य पक्षातील नेते मंडळी तसेच माेदी विराेधक करु लागले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माेदींचा हा चुनावी जुमला : यशाेमती ठाकूर

काॅंग्रेस आमदार यशाेमती ठाकूर (yashomati thakur) म्हणाल्या गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचा निर्णय म्हणजे चुनावी जुमला आहे. खरंच जर महिलांचे हित त्यांच्या मनामध्ये असतं तर पंतप्रधान हे मणिपूरला देखील जाऊन आले असते. तिथलं काय छळ झाला ते बघून आले असते. पण त्यांना त्यामध्ये काही रस नाही. त्यांना चुनावी जुमल्यामध्ये रस असल्याची टीका आमदार ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर केली.

congress mla criticise pm modi on lpg gas cylinder price cut by rs 100
महाशिवरात्री 2024 : हर हर महादेव... शंभाे शिव शंकरा घाेषाने दुमदुमली राज्यातील मंदिरे

माेंदीचा हा निवडणूक फंडा : रवींद्र धंगेकर

केंद्र सरकारने १०० रुपयांनी गॅस दर कमी केले आहेत. गेले सात-आठ वर्षात गॅस व पेट्रोलचे दर वाढल्याने जनता त्रस्त आहे. ४०० रुपयांचा गॅस ११००/ १२०० रुपयाला मिळतो. आता १०० रुपये कमी केले निवडणुका झाली की ५०० रुपयांनी गॅस दर वाढवतील. त्यामुळे मोदी गॅरेंटीत नागरिक सुखी नाहीत असा टोला कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्र सरकारवर लगावला आहे.

congress mla criticise pm modi on lpg gas cylinder price cut by rs 100
Tarkarli : आधी राेजगार द्या! तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन घोषित, सरपंचासह ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदाेलन

निवडणूक फंडा म्हणून १०० रुपये कमी केलेत. महिला दिन प्रत्येक वर्षी येतो पण १० वर्षात कधी गॅस दर कमी नाही झाले. आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दर कमी केले आहेत. याला महिला भगिनी भिक घालणार नाहीत असेही आमदार धंगेकर यांनी नमूद केले

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या निर्णयावर समाज माध्यमातून देखील माेदी विराेधक टीका करीत आहेत. काहींनी निवडणुकीची तारीख जवळ येताच पंतप्रधानांनी स्वतः गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. गॅसच्या किमती वाढण्यास आणि वाढत्या महागाईला पंतप्रधानच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

congress mla criticise pm modi on lpg gas cylinder price cut by rs 100
SSC Exam 2024 : दहावीचा पेपर सुरु असताना पाेरं शाळेच्या भितींवर चढली, कॉपी बहाद्दरांना केला पूरवठा; व्हिडिओ 'साम टीव्ही'च्या हाती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com