Rajasthan Election: 'गरीबांसाठी मी तुरुंगात जाण्यासही तयार', राजस्थानमध्ये PM मोदी असं का म्हणाले?

Pm Narendra Modi Latest News: 'गरीबांसाठी मी तुरुंगात जाण्यासही तयार', राजस्थानमध्ये PM मोदी असं का म्हणाले?
Pm Narendra Modi On Congress
Pm Narendra Modi On CongressSaam Tv
Published On

Pm Narendra Modi On Congress:

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी आज राजस्थानमधील भरतपूरमध्ये पोहोचले. यावेळी विजय संकल्प सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 3 डिसेंबरला राजस्थानची जनता काँग्रेस आणि मुख्यमंत्री गेहलोत यांचा सत्तेतून हद्दपार करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''काँग्रेसने निवडणूक आयोगात माझ्याविरोधात एवढं भलंमोठं पत्र दिलं आहे. ते कोर्टात जाण्याची धमकी देत ​​आहे. पण गरिबांसाठी तुरुंगात जाण्यासही मी तयार आहे.' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Narendra Modi On Congress
Aaditya Thackeray: आज बाळासाहेबांना आनंद झाला असता! गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले, CM शिंदेंवरही नेम

पंतप्रधान म्हणाले की, ''राजस्थानमधील जनता भाजप सरकार स्थापन करण्यासाठी खूप उत्साहित आहे.'' यासोबतच गेहलोत यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, ''काही लोक स्वत:ला जादूगार म्हणवतात, पण राज्यातील जनता म्हणत आहे की, काँग्रेस 3 डिसेंबरला हद्दपार होईल. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या जनतेला राज्यातून भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करण्याचे आश्वासनही दिले. याठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले जाईल, भाजपने येथील जनतेला जी काही आश्वासने दिली आहेत, ती नक्कीच पूर्ण केली जातील, असं त्यांनी सभेत बोलताना आश्वासन दिलं आहे.

Pm Narendra Modi On Congress
Chhagan Bhujbal News: 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका, पण...' छगन भुजबळ स्पष्टच बोलले

गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या विद्यमान सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, एकीकडे भारत जगात प्रगती करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारने राजस्थानला गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, दंगली आणि भ्रष्टाचारात आघाडीवर नेहलं आहे. रामनवमी असो, होळी असो किंवा हनुमान जयंती असो, येथील लोक कोणताही सण शांततेने साजरा करू शकत नाहीत. राजस्थानमध्ये फक्त कर्फ्यू, दगडफेक आणि दंगली घडताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com