Gujrat Election : PM नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, आशीर्वाद घेतले; उद्या अहमदाबादेत मतदान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे त्यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांची भेट घेतली.
PM Modi meets mother Heeraben Modi in Gandhinagar
PM Modi meets mother Heeraben Modi in GandhinagarSaam tv
Published On

Pm Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा जोमाने प्रचार करत आहे. काल शनिवारी गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम संपली आहे. त्यानंतर आज, रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे त्यांच्या आई हीराबेन मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आईसोबत चहाचा आस्वाद घेतला. (Latest Marathi News)

PM Modi meets mother Heeraben Modi in Gandhinagar
'कम्युनिस्टांनो भारत सोडा...'; जेएनयू विद्यापीठात भिंतीवर हिंदू रक्षा दलाच्या भडकाऊ घोषणा

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. गुजरातच्या मध्य आणि उत्तर भागातील नागरिक मतदान करतील.

मध्य आणि उत्तर गुजरातचे एकूण १४ जिल्ह्यातील ९३ जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्य्यातील मतदानाचा निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादमध्ये मतदान करणार आहे. तसेय या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासहित भाजपचे दिग्गज नेते मतदान करतील.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे १४ जिल्ह्यातील ९३ जागांवर ८३३ उमेदवार उभे होते. यात ६९ महिला उमेदवारांचा सामावेश आहे. तसेच ७६४ पुरुष उमेदवार रिंगणात होते. अहमदाबादमधील २१ जागांवर सर्वात अधिक २४९ उमेदवारांनी निवडणूक लढवली. तर बनासकांठामधील ९ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात उभे होते. तर वडोदराच्या १० जागांसाठी ७२ उमेदवार रिंगणात उभे होते.

PM Modi meets mother Heeraben Modi in Gandhinagar
Devendra Fadnavis: ज्यांना रामाचं अस्तित्व मान्य नाही, त्यांना रावण लक्षात आहे; गुजरातमध्ये फडणवीस कडाडले

आणंद येथील ७ जागांवर ६९ उमेदवार रिंगणात उभे होते. महेसाणा येथील ७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात उभे होते. गांधीनगर येथील ५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात उभे होते. खेडा येथील ६ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात उभे होते. पाटनच्या ४ जागांसाठी ४३ उमेदवार उभे होते. तर पंचमहलच्या ५ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात उभे होते. दाहोदच्या ६ जागांसाठी ३५ उमेदवार उभे होते.

अरवलीच्या ३ जागांसाठी ३० उमेदवार उभे होते. साबरकांठा येथील ४ जागांसाठी २६ उमेदवारांनी निवडणूक लढवली. महीसागर येथील ३ जागांसाठी २२ उमेदवारांनी निवडणूक लढवली. तर छोटा उदयपूर येथील ३ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात उभे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com