Amrit Bharat Express : PM मोदींनी अयोध्येत दाखवला ६ वंदे भारत, २ अमृत भारत रेल्वेंना हिरवा झेंडा; जाणून घ्या तिकीट दर आणि वेळापत्रक

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेल्वे प्रवाशांसाठी गिप्ट दिलं. मोदींनी आज ८ नव्या रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यात २ अमृत भारत एक्सप्रेस आणि तर ६ वंदे भारत एक्सप्रेस आहेत. अमृत भारत पहिल्यांदा लोकसेवेत दाखल झालीय. दरम्यान या रेल्वेंचे टाइम टेबल काय असेल तसेच काय तिकीट असेल हे जाणून घेऊ.
Amrit Bharat Express
Amrit Bharat ExpressANI
Published On

PM Modi Flag off Amrit Bharat Express :

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज रोड शो करत अयोध्या रेल्वे स्टेशनला पोहोचले. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक उपस्थित होते. अयोध्या रेल्वे स्टेशनचा पुनर्विकासाच पहिला टप्पा २४०कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलाय. या रेल्वे स्टेशनला अयोध्या धाम जंक्शन नाव देण्यात आलंय. हे स्टेशन तीन मजील असून यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.(Latest News)

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) देशातील सुपरफास्ट प्रवाशी रेल्वेंना (Railway) हिरवा झेंडा दाखवला. अमृत भारत (Amrit Bharat) रेल्वेत सुंदर आणि आकर्षक डिझाइनचे सीट्स आणि वस्तू ठेवण्यासाठी कपाटं, मोबाइल चार्जिंग पॉइंट देण्यात आलेत. एलईडी लाइट,सीसीटीव्ही,सार्वजनिक सूचना प्रणाली सारख्या सुविधा देण्यात आल्यात. या रेल्वेंचा काय तिकीट दर असेल, वेळापत्रक काय असेल हे जाणून घेऊ.

अमृत भारत एक्सप्रेस (Amrit Bharat Express) रेल्वेही नवी रेल्वे आहे. सामान्य लोकांना गरज लक्षात घेता ही रेल्वे सुरु करण्यात आलीय. या नॉन -एसी ट्रेनला सेकंड क्लास आणि अराखीव तसेच स्लीपर कोच देण्यात आले आहेत. या ट्रेनच्या दोन्ही बाजुला ६००० एचपी P5 लोकोमोटिवसह ही रेल्वे प्रतितास १३० किमीच्या गतीने धावेल. अमृत भारत रेल्वे पुश पूल टेक्निकवर चालवलं जात आहे. वंदे भारतला एक्सप्रेसला (Vande Bharat Express) देशाच्या विविध राज्यात आणि भागात सुरू केलं जातं आहे. वंदे भारत रेल्वे प्रतितास १६० किमीच्या वेगाने धावते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्या अमृत भारत एक्सप्रेसचा मार्ग आणि वेळ

अयोध्या अमृत भारत एक्सप्रेस दरभंगा ते दिल्ली आनंद विहारच्या टर्मिनल पर्यंतचा प्रवास करेल. या रेल्वेत १२ स्लीपर क्लास आणि ८ अनरिजर्वर्ड सेकंड क्लास कोच देण्यात आलाय. रेल्वे क्रमांक १५५५७ प्रत्यके सोमवारी आणि गुरुवारी दुपारी तीन वाजता दरभंगाहून निघेल. ही रेल्वे २१ तास ३५ मिनिटांचा प्रवास करतत दुसऱ्या दिवशी दिल्लीतील आनंद विहारमध्ये पोहोचेल. आनंद विहारवरून दुसऱ्या दिवशी रेल्वे क्रमांक १५५५८ दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी आपला परतीची प्रवास सुरू करेल. ही रेल्वे २० तास ४० मिनिटाचा प्रवास करत दुसऱ्या दिवशी ११.२० दरभंगा येथे पोहोचेल.

या स्टेशनवर थांबेल

अमृत भारत रेल्वे कमतौल, जनकपूर रोड, सीतामढी, बैरागनिया, रक्सौल, नरकटियागंज, बाघा, कप्तानगंज, गोरखपूर, बस्ती, मानकापूर, अयोध्या धाम, लखनौ, कानपूर सेंट्रल, इटावा, टुंडला, अलीगढ जंक्शन, आनंद विहार येथे थांबेल. IRCTC ने अद्याप आपल्या वेबसाईटवर ट्रेन तिकिटाची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु एका वृत्तानुसार, ० ते ५० किमीपर्यंत अनारक्षित द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी ३५ रुपये मोजावे लागतील. दुसरी अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे मालदा टाऊन ते बेंगळुरू (सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल) दरम्यान धावेल.

वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग

१)

श्री माता वैष्णो देवी कटरा ते नवी दिल्लीदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. वर्ष २०१९ मध्ये दिल्लीहून कटरापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती. त्यानंतर ही रेल्वे इतर मार्गवार चालवण्यात यावी याची मागणी केली जात होती.

२) अमृतसर- दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस - रेल्वे क्रमांक २०४८८ सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी अमृतसरहून निघेल आणि ५ तास ३० मिनिटांचा प्रवास करत दुपारी दीड वाजता दिल्ली जंक्शनला पोहोचेल.

३) ट्रेन ऑपरेशन कोईम्बतूर-बेंगळुरू

४) वंदे भारत - जालना- मुंबई दरम्यानही धावणार आहे. रेल्वे क्रमांक २०७०५ सकाळी ५ : ०५ वाजता ही रेल्वे जालनाहून निघेल आणि ११.५५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. ही रेल्वे औरंगाबद, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर स्टेशनवर थांबेल. ही रेल्वे परतीचा प्रवास रेल्वे क्रमांक २०७०६ दुपारी १.१० वाजता मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनवरून निघेल आणि रात्री ८ वाजता जालनाला पोहोचेल.

५) अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस ही पाचवी ट्रेन आहे. ही रेल्वे सकाळी ६.१० वाजता आनंद विहारवरुन निघेल दुपारी २.३० वाजता अयोध्या कॅट स्टेशनवर पोहोचेल.

६ ) वंदे भारत एक्सप्रेस - मंगळुरू-मडगाव गोवा मार्गावर चालवण्यात येईल.

Amrit Bharat Express
PM Modi Ayodhya : कोण आहे ती गरीब महिला? पीएम मोदींनी का घेतला तिच्या घरी चहा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com