

मेन राज्यात खासगी जेट विमानाचा भीषण अपघात
टेकऑफ करतानाच विमान कोसळलं
बर्फाळ वादळ आणि जोरदार हिमवृष्टीमुळे अपघाताची शक्यता
अमेरिकेतील 'मेन' राज्यात एका खासगी जेट विमानाचा भीषण अपघात झालाय. बँगोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करतानाच विमान कोसळलं असून यात ७ जणांचा मृत्यू झालाय. तर एका क्रू मेंबरला गंभीर दुखापत झाली आहे. अशी माहिती फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलीय. दरम्यान बोस्टनच्या उत्तरेकडील सुमारे २०० मैल अंतरावर असलेलं विमानतळ विमानाच्या दुर्घटनेनंतर बंद पडले.
रविवारी रात्री न्यू इंग्लंडसह अमेरिकेतील काही भागात बर्फाळ वादळ आलं होतं. दुर्घटना घडला तेव्हाही त्या भागात जोरदार हिमवृष्टी होत होती. हाती आलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार ७:४५ वाजता 'बॉम्बार्डियर चॅलेंजर ६००' नावाचे विमान उड्डाण करत होते. त्याचवेळी कोसळले. या विमानात एकूण ८ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.
दरम्यान विमान कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, "एक प्रवासी विमान उलटे झाले आहे," असा संदेश नियंत्रण कक्षाला देण्यात आला होता. तसेच अपघातग्रस्त विमान हे एका कॉर्पोरेशनच्या नावाने नोंदणीकृत होते. ह्युस्टन, टेक्सास येथे वैयक्तिक दुखापत कायदा फर्म अर्नोल्ड आणि इटकिन ट्रायल लॉयर्स या कॉर्पोरेशनच्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे.
कायदा फर्मच्या संस्थापक भागीदारांपैकी एक विमानाच्या मालकीच्या कंपनीसाठी नोंदणीकृत एजंट देखील आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी बँगोरमध्ये जोरदार हिमवृष्टी होत होती. वादळामुळे व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) अत्यंत कमी होती. खराब हवामान हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
एनटीएसबीने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार विमान टेक-ऑफ करताना क्रॅश झाले. अपघातानंतर विमाने पेट घेतला. परंतु तपास करणारे पथक घटनास्थळी एक-दोन दिवसांत पोहोचतील. अपघाताचा तपास करतील त्यानंतर दुर्घटनेचे खरं कारण काय होतं, हे तपासलं जाईल. एनटीएसबीने म्हटले आहे की पीडितांबद्दलची माहिती जाहीर करण्यात त्यांची कोणतीही भूमिका नाही. तसेच अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांद्वारे हाताळली जाते.
परंतु विमानतळ संचालक जोस सावेद्रा यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान विमान उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सुमारे ४५ सेकंदांनी हवाई वाहतूक नियंत्रकांना आलेल्या मेसेज मध्ये विमान दुर्घटनेची माहिती कोणीतरी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.