Petrol Diesel Price: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचा इंधनाचा भाव

Petrol Diesel Price Today 23 June: भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.
Petrol Diesel Price
Petrol Diesel Price Saam Tv
Published On: 

Petrol Diesel Rate in Marathi:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज थोडीशी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ०.०९ डॉलरने घसरून प्रति बॅरल ६९.४२ डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.०४ डॉलरने घसरून प्रति बॅरल ७४.०१ डॉलरवर व्यापार करत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. (Latest Marathi News)

Petrol Diesel Price
UP Crime News : समलिंगी महिलेला गर्लफ्रेंडशी करायचं होतं लग्न, लिंग बदलण्यासाठी मांत्रिकाला भेटली, भयंकर शेवट

आज काही राज्ये वगळता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. राजस्थानमध्ये आज पेट्रोल ७३ पैशांनी तर डिझेल ६६ पैशांनी महागलं आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल ४३ पैशांनी स्वस्त झाले आहे. झारखंडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २६ पैशांनी घट झाली आहे. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्येही इंधन स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Price
Maharashtra Politics: उद्या काही नेते हातात हात घेऊन फोटो काढतील, पण मविआप्रमाणे ही आघाडीही पंक्चर होईल - देवेंद्र फडणवीस

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com