Maharashtra Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; इथे चेक करा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv
Published On: 

Petrol Diesel Latest Rate: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल 75.65 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड 79.30 डॉलरवर विकले जात आहे. त्यातच मंगळवारी सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

Petrol Diesel Prices
Raju Shetti News : राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदी, सोशल मीडिया वापराबाबतही दिले आदेश

बिहारमध्ये पेट्रोल (Petrol) 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 47 पैशांची घसरण झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल 1 रुपये आणि  डिझेल (Diesel)  78 पैशांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 41 पैशांनी वाढून 106.85 रुपये तर डिझेल 93.35 रुपयांवर पोहोचले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. (Petrol Diesel Price)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Prices
Bacchu Kadu News : बच्चू कडूंनी आशा सोडली; म्हणाले, मला नाही वाटत मंत्रिमंडळ विस्तार होईल

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com