Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Patna Shocking News: पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणातील टिनी टॉट शाळेजवळील नाल्यात एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
Patna Shocking News
Patna Shocking NewsGoogle

पाटणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणातील टिनी टॉट शाळेजवळील नाल्यात एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचे वय फक्त ७ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. ७ वर्षीय मुलाचा शाळेजवळ मृत्यू झाल्याने स्थानिक लोक आक्रमक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कुमार असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो रोज शाळेत जायचा. शाळा सुटल्यानंतर शाळेतील ट्यूशनमध्ये शिकायचा. त्यामुळे तो ट्यूशनवरुन संध्याकाळी घरी यायचा. मात्र, गुरुवारी आयुष घरीच आलाच नाही. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना काळजी वाटली. त्यांनी आयुषला शोधण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री ३ वाजता आयुषचा मृतदेह शाळेजवळील नाल्यात सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांनी देण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. परंतु शाळेजवळच मुलाचा मृतदेह सापडल्याने मोठ्या प्रमाणावर पालक आक्रमक झाले आहे. पालकांचा जमाव शाळा आणि पोलिस स्टेशनच्या परिसरात जमला. या घटनेसंदर्भात मृत मुलाच्या पालकांनी माहिती दिली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जवळपास १० मिनिटे गायब असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Patna Shocking News
Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी, व्हीआयपी दर्शनही बंद; सरकारकडून नवा आदेश जारी

यामुळे आता शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पालकांच्या जमावाने शाळेत तोडफोड केली. शाळेत आग लावली. यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्नीशमन दलाने ही आग विझवली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. पोलिस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.

Patna Shocking News
Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com