Passenger Stuck in Plane : किंचाळ्या, आराडाओरड अन् धूर... तांत्रिक बिघाडामुळे हजारो फूट उंचीवर विमानात अडकलेल्या प्रवाशांचा VIDEO Viral

Passenger Stuck in Plane : एकीकडे विमानात धुराचं साम्राज्य दिसत आहेत तर दुसरीकडे प्रवासी घाबरुन आरडा ओरड करताना दिसत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video : विमानांच्या अपघाताच्या अनेक घटना तुमच्या लक्षात असतील. अनेक विमान अपघातांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून विमान अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. असाच एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओत विमानात धूर निघताना दिसत आहे. विमानतील या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसल्याचं दिसून येत आहे. हे विमान सुरक्षित जमिनीवर लँड झाले असले तरी प्रवाशांच्या आयुष्यभर लक्षात राहिल अशी ही घटना आहे. लोक कसे घाबरले हे व्हिडिओ पाहून दिसून येत आहे. (Latest News Update)

Viral Video
Accident CCTV Footage: बाईकची घोड्याला जोरदार धडक! काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

व्हिडीओतील दृष्यांनुसार विमानाच्या आत धूर निघत आहे. एकीकडे विमानात धुराचं साम्राज्य दिसत आहेत तर दुसरीकडे प्रवासी घाबरुन आरडा ओरड करताना दिसत आहे. धुरामुळे काही प्रवाशांची प्रकृती बिघडल्याचंही दिसून येत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही घडल्याचं समजतंय. मात्र या सर्व प्रवाशांमध्ये मृत्यू जवळून पाहिल्याची भावना नक्कीच असेल.

Viral Video
Dog Attack CCTV Footage : भटक्या कुत्र्यांकडून स्कुटीचा पाठलाग; मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या महिलेचा अपघात, थरारक व्हिडीओ

मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान सुरक्षितपणे जनिमीवर उतरवले. या घटनेती कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. OddIy Terrifying या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1.1 कोटी लोकांनी पाहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com