Parliament Monsoon Session: पहिल्याच दिवशी संसदेत घमासान! 'पेपरफुटी'वरुन राहुल गांधी आक्रमक; शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर

Parliament Monsoon Session 2024: विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच अखिलेश यादव यांनी पेपर फुटीप्रकरणावरुन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
Parliament Monsoon Session: पहिल्याच दिवशी संसदेत घमासान! 'पेपरफुटी'वरुन राहुल गांधी आक्रमक;  शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर
Parliament Monsoon Session 2024: Saamtv
Published On

दिल्ली, ता. २२ जुलै २०२४

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरू होत आहे. आज अर्थमंत्री निर्मला सितारामण या मोदी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. तत्पुर्वी संसदेत पेपर फुटीवरुन सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच अखिलेश यादव यांनी पेपर फुटीप्रकरणावरुन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Parliament Monsoon Session: पहिल्याच दिवशी संसदेत घमासान! 'पेपरफुटी'वरुन राहुल गांधी आक्रमक;  शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकलाय; वाघनखांची उठाठेव कसली करताय, 'सामना'तून जहरी टीका

काय म्हणाले राहुल गांधी?

विरोधी पक्षनेते राहुल म्हणाले की, "पेपरफुटीची चर्चा केवळ NEET च्या संदर्भात होत नाही तर ती सर्व परीक्षांबाबत आहे. हा गंभीर विषय आहे. शिक्षणमंत्र्यांनी सगळ्यांच्या चुका सांगितल्या पण स्वत:बद्दल बोलले नाहीत. त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी काय केले? असा थेट सवाल उपस्थित केला.

तसेच "भारताची परीक्षा पद्धत खोटी असल्याची त्यांना पूर्ण खात्री आहे. लाखो लोकांना वाटते की तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही भारताची परीक्षा प्रणाली विकत घेऊ शकता. विरोधकांनाही तेच वाटते. जर ही समस्या असेल तर तुम्ही ती सोडवण्यासाठी काय करत आहात?" असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

Parliament Monsoon Session: पहिल्याच दिवशी संसदेत घमासान! 'पेपरफुटी'वरुन राहुल गांधी आक्रमक;  शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर
Chhatrapati Sambhajinagar Crime: खळबळजनक! वाळुज MIDC परिसरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

दरम्यान, "NEET वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला या मुद्द्यावर राजकारण करायचे नाही. यूपीचे मुख्यमंत्री असताना अखिलेश यांच्या कारकिर्दीत किती पेपर लीक झाले आहेत, हे सर्वांच्या लक्षात आहे," असं म्हणत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिले.

Parliament Monsoon Session: पहिल्याच दिवशी संसदेत घमासान! 'पेपरफुटी'वरुन राहुल गांधी आक्रमक;  शिक्षणमंत्र्यांचेही सडेतोड उत्तर
Mumbai Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार, भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना उडवलं, अपघातानंतर चालक फरार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com