Paramhans Acharya: राम मंदिर झालं, आता औरंगजेबाची कबर उखडून फेकू; संत परमहंस आचार्य यांचं विधान

Paramhansa Acharya News: राम मंदिर झालं, आता पुढचं काम महाराष्ट्रातील ऒरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यायची आहे, असं विधान परमहंस आचार्य यांनी केलं आहे.
Paramhansa Acharya on Aurangzeb Tomb
Paramhansa Acharya on Aurangzeb TombSaam TV

Paramhansa Acharya on Aurangzeb Tomb

अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस आचार्य नेहमी कोणत्या ना कोणत्या विधानाने चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता परमहंस आचार्य यांनी पुन्हा एक मोठं विधान केलं आहे.  (Breaking Marathi News)

Paramhansa Acharya on Aurangzeb Tomb
Ayodhya News: अयोध्येत रामनवमीचा उत्साह, शरयू नदीवर रामभक्तांची गर्दी; दर्शनासाठी लांबच लांब रांगा

राम मंदिर झालं, आता पुढचं काम महाराष्ट्रातील ऒरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यायची आहे, असं विधान परमहंस आचार्य यांनी केलं आहे. केवळ औरंगजेबच नाही, तर अयोध्येतील राम मंदिराला अडचणी आणल्या त्यांच्या सर्वांच्या कबरी खोदून टाकू, असं विधानही परमहंस आचार्य यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे मोठा वादंग उठण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

देशभरात आज रामनवमीचा उत्साह आहे. यानिमित्त अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) दर्शन घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येला दाखल होत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील अयोध्येत जाऊन आज रामलल्लाचं दर्शन घेतलं. यावेळी संत परमहंस आचार्य देखील त्यांच्यासोबत होते.

"महाराष्ट्रातील ऒरंगजेबाची कबर उखडून फेकणार"

यावेळी संत परमहंस आचार्य यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "राम मंदिर बनलं आहे. ज्यांनी अडचणी आणल्या त्यांच्या कबरी खोदून काढून टाकून देऊ. संभाजी महाराज यांना फसवण्यात आले होते. आता त्या औरंगजेबची कबर आपल्याला उखडून टाकून द्यायची आहे. केवळ औरंगजेबच नाही, तर अशा सर्वांच्या कबरी खोदून काढायच्या आहेत. आता पुढचं पाऊल औरंगजेबची कबर खोदून काढणं हेच आपलं काम आहे", परमहंस आचार्य म्हणाले.

"राम मंदिर आमचे होते. मात्र, मध्यल्या काळात काही राक्षस आले. त्यावेळी त्यांनी अनेक मंदिरे तोडले. पण राम भक्तांनी तब्बल ५०० वर्ष संघर्ष केला. अनेक पिढ्या निघून गेल्या, मात्र आता सनातन धर्माची इच्छा पूर्ण झाली आहे. राममंदिर निर्माणमध्ये शिवसेनेची सर्वात मोठी भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे हे सनातन धर्म मानणारे होते", असं देखील परमहंस आचार्य म्हणाले.

"एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी विचारांचा सिद्धांत सोडला, त्याच एकनाथ शिंदे यांनी त्यांना सोडलं", असंही परमहंस आचार्य म्हणाले.

Paramhansa Acharya on Aurangzeb Tomb
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन; राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com