Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण

Papua New Guinea Landslide Update: पापुआ न्यू गिनीआची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून जवळपास ६०० किलोमीटर उत्तर-पश्चिम भागातील एंगा प्रांतामध्ये असलेल्या काओकलाम गावामध्ये शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास भुस्खलन झाले.
Papua New Guinea Landslide:  पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण
Papua New Guinea LandslideSaam Tv

पापुआ न्यू गिनीआमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत (Papua New Guinea Landslide) मोठी अपडेट समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीआमध्ये झालेल्या भूस्खलनाबाबत नॅशनल डिझास्टर सेंटरने महत्वाची माहिती दिली. देशाच्या उत्तरेकडील भागातील एका दुर्गम गावात २४ मे रोजी म्हणजे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात २००० हून अधिक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेलेत.

पापुआ न्यू गिनीआची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून जवळपास ६०० किलोमीटर उत्तर-पश्चिम भागातील एंगा प्रांतामध्ये असलेल्या काओकलाम गावामध्ये शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास भुस्खलन झाले. यामुळे संपूर्ण गाव जमिनदोस्त झाले. घटनास्थळावर सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या एका अधिकाऱ्याने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भूस्खलनात २ हजारांहून अधिक लोकं जिवंत गाडले गेलेत. इमारती आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे देशाच्या आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अशामध्ये पापुआ न्यू गिनीआमध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. २० ते २६ फूट ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या नागरिकांची वाचण्याची शक्यता कमी आहे.

Papua New Guinea Landslide:  पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण
Rahul Gandhi: सभेसाठी आले आणि स्टेज कोसळला, राहुल गांधी थोडक्यात बचावले; VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने सांगितले की, या प्रांतातील मुलितका भागात भूस्खलनामुळे ६ पेक्षा जास्त गावे बाधित झाली आहेत. यूएन मायग्रेशन एजन्सी आयओएमने सांगितले की, १०० हून अधिक घरे, एक प्राथमिक शाळा, छोटे व्यवसाय आणि स्टॉल्स, एक गेस्ट हाऊस आणि एक पेट्रोलपंप भूस्खलनात जमीनदोस्त झाले आहेत.

Papua New Guinea Landslide:  पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांनी आई-वडिलांची मागितली माफी; 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच दिली माहिती

पापुआ न्यू गिनीआ हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला स्थित एक बेट आहे आणि भूस्खलनाने प्रभावित क्षेत्रे त्याच्या उत्तरेकडील एन्गा प्रांतातील उंच प्रदेशात आहेत. भूस्खलनग्रस्त भागात सुमारे ४००० लोकं राहत होती. भूस्खलनात मृतांचा नेमका आकडा अद्याप समोर आला नाही. पण मृतांचा आकडा वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

Papua New Guinea Landslide:  पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं; बंगालमध्ये जोरदार वारा अन् तुफान पाऊस, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com