Rahul Gandhi: सभेसाठी आले आणि स्टेज कोसळला, राहुल गांधी थोडक्यात बचावले; VIDEO व्हायरल

Rahul Gandhi Stage Collapsed: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या प्रचारसभेचे बिहारमध्ये आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी आले असता स्टेज कोसळला. सुदैवाने या घटनेत राहुल गांधी यांना दुखापत झाली नाही.
Rahul Gandhi: सभेसाठी आले आणि स्टेज कोसळला, राहुल गांधी थोडक्यात बचावले; VIDEO व्हायरल
Rahul Gandhi Stage Collapsed VideoSaam Tv

बिहारमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेपूर्वी मोठी घटना घडली. सभेसाठी राहुल गांधी मंचावर आले आणि स्टेज कोसळला. या घटनेमध्ये राहुल गांधी थोडक्यात बचावले. त्यांना दुखापत झाली नाही. स्टेजवर राहुल गांधी यांच्यासोबत अनेक नेते उभे होते. स्टेज कोसळत असताना सर्वांनी एकमेकांना हात धरून वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरून आता भाजपने राहुल गांधी यांना ट्रोल केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या देशाच्या विविध भागात निवडणूक रॅलींना संबोधित करत आहेत. सोमवारी राहुल गांधी हे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांची कन्या आणि पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीसा भारती यांच्या प्रचारासाठी बिहारमध्ये आले होते. बिहारची राजधानी पाटणाच्या पालीगंज येथे त्यांची सभा झाली. या सभेचा स्टेज अचानक कोसळला.

सभेसाठी राहुल गांधी, मीसा भारती यांच्यासह अनेक नेते स्टेजवर उपस्थित होते. त्याचवेळी अचानक स्टेजचा काही भाग कोसळला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्टेजचा काही भाग अचानक कोसळतो. त्यानंतर राहुल गाधी, मीसा भारती यांच्यासह इतर नेते एकमेकांचा हात धरून सर्वांना सावरताना दिसतात. या घटनेत राहुल गांधी थोडक्यात बचावले. राहुल गांधी यांच्यासह कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे सभास्थळी काहीकाळ गोंधळ उडाला होता.

Rahul Gandhi: सभेसाठी आले आणि स्टेज कोसळला, राहुल गांधी थोडक्यात बचावले; VIDEO व्हायरल
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांनी आई-वडिलांची मागितली माफी; 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच दिली माहिती

बिहारमध्ये जाहीर सभेपूर्वी राहुल गांधींच्या सभेचा स्टेज कोसळल्याच्या घटनेनंतर भाजपने टीका केली. भाजप खासदार राम कृपाल यादव यांनी सांगितले की, 'स्टेज कोसळला? ही तर फक्त सुरुवात आहे... 4 जूननंतर काय काय कोसळेल हे माहीत नाही?', असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. आता राहुल गांधींच्या सभेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राहुल गांधींनी भाषण करताना मीसा भारती यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

Rahul Gandhi: सभेसाठी आले आणि स्टेज कोसळला, राहुल गांधी थोडक्यात बचावले; VIDEO व्हायरल
Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआ भूस्खलनात मोठी अपडेट, जिवंत गाडले गेले २००० पेक्षा जास्त जण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com