India vs Pakistan: पाकिस्तानची पुन्हा पोकळ धमकी; अणुबॉम्ब वापरण्याची दर्पोक्ती

Pakistan Threat To India: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढलाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात रोज नवनवी विधानं केली जातायतं. त्यातच आता पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यानी भारताला थेट धमकी दिलीय. काय आहे धमकी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
India vs Pakistan
Pakistan Threat To Indiasaam tv
Published On

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु केलीय. त्यामुळे पाकड्यांचा भीतीने थरकाप उडालाय. त्यात पाकिस्तानी नेत्यांक़डून भारताला पोकळ धमक्या दिल्या जाऊ लागलेत. आता पाकचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिलीय.

अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत पाकिस्तानच्या पुढे असूनही पाकिस्तानच्या मंत्र्यांने दिलेल्या धमकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जोरदार प्रत्युत्तर दिलयं. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असणारे सिंधु पाणी करार रद्द केला, तसेच पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. त्यामुळेच पाकिस्तानचा तिळपापड उडालाय. त्यात आता पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी भारताला थेट धमकी दिलीय.

मात्र पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना कदाचित भारताच्या अणु शस्त्र सज्जतेची जाणीव नसावी. त्यामुळेच त्यांनी पोकळ धमक्या दिलेत. भारत आणि पाककडे किती अण्वस्त्रे आहेत ती पाहूया.

शस्त्रसज्ज भारत, दुबळा पाकिस्तान

अणूबॉम्ब सज्जतेबाबत भारत सहाव्या स्थानावर तर पाक सातव्या क्रमांकावर

भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170

भारताकडे उच्च क्षमतेचे 10-20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे एकही नाही

भारताकडे 50-100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता, तर पाकिस्तानकडे 50-80 वॉरशेड निर्माण करण्याइतकं युरेनियम

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झालयं. त्यामुळे पाकड्यांकडून अशी प्रक्षोभक विधानं केली जातयंत. मात्र भारत लवकर या शत्रूला तोडीस तोड उत्तर देईल. ज्यामुळे पाकिस्तान पुन्हा असे कृत्य करण्यास धजावणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com