कर्ज मागताना आता लाज वाटते, पंतप्रधानांचा कबूलनामा

Shehbaz Sharif Says Borrowing Money Is Shameful: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या एका वक्तव्यानं कंगाल पाकिस्तानचं वास्तव जगासमोर आलंय. जगभर कर्जासाठी झोळी पसरताना लाज वाटते, असा कबूलनामाच शरीफ यांनी दिलाय. पाहूयात पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या देशातल्या स्थितीबद्दल नेमकं काय म्हणाले आहेत.
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif addresses the nation amid growing economic crisis and mounting debt pressure.
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif addresses the nation amid growing economic crisis and mounting debt pressure.Saam Tv
Published On

काश्मीर प्रश्नावरून भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानात खायचे वांदे आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या बातम्या वारंवार प्रसारित केल्या आहेत. मात्र आता कंगाल पाकिस्तानच्या या परिस्थितीचं भयाण वास्तव खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच जगासमोर मांडलंय. कर्ज मागण्यासाठी आता लाज वाटते. पाकिस्तानला अनेक देशांसमोर कर्जासाठी पदर पसरावा लागतो. या आर्थिक हतबलतेमुळे देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचलीय. कर्ज घेणाऱ्याची मान नेहमी झुकलेलीच असते, अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचा कबूसनामाच दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ नेमकं काय म्हणाले, तुम्हीच ऐका

पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून कर्जावरच अवलंबून आहे. मात्र, यावेळी IMF ने कर्ज देताना अत्यंत कडक अटी लादल्या असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. या अटींमुळे सरकारला नाईलाजाने मोठ्या प्रमाणावर कर वाढवावा लागला आहे. परिणामी, पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठलाय. जनतेला मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतोय.

कंगाल पाकिस्तान कर्जाच्या विळख्यात

फेडरल सरकारने पाकिस्तानच्या देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची माहिती जाहीर केलीय, पाकिस्तानातील एकूण कर्ज 71 ट्रलियन डॉलरपर्यंत पोहचलंय. ज्यामध्ये देशाच्या एकूण कर्जात ६६% देशांतर्गत कर्ज आणि ३४% परदेशी कर्ज आहे. पाकिस्तानला अलीकडेच IMF कडून 1.2. अब्ज डॉलर्सचा हप्ता मिळालाय. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं महागाई वाढण्याच्या भीतीने मुख्य व्याजदर 10.5% वर स्थिर ठेवलाय.

एकीकडे काश्मीरप्रश्नावरून भारताला धमकी द्यायची, सीमेवर कुरघोड्या करायच्या आपल्याच देशात दहशवादी घडवण्याच्या फॅक्ट्र्या उघडायच्या हेच पाकिस्तानचं आजवरचं धोरण...पण पंतप्रधानांच्या या कबुलीमुळे पाकचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. यातून सावरायचं असेल तर पाकिस्ताननं आतातरी शहाणपण दाखवायला हवं. भारतात कारवाया करण्यापेक्षा आपली आर्थिकी स्थिती सुधारण्यावर भर द्यायला हवा. नाहीतर पाकिस्तानचीही अवस्था व्हेनेझुएलासारखी व्हायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com