Pakistan National Assembly Dissolved: पाकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी! मध्यरात्री संसद बरखास्त; राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

Pakistan News: पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालठ झाली असून मध्यरात्रीच पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्याची बातमी समोर आली आहे.
Pakistan National Assembly Dissolved
Pakistan National Assembly DissolvedSaamtvnews
Published On: 

Pakistan Assembly News: पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालठ झाली असून मध्यरात्रीच पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पाकची संसद बरखास्त केली.

Pakistan National Assembly Dissolved
Amit Shah on Manipur: संसदेतील आक्रमक भाषणानंतर अमित शहा अ‍ॅक्शन मोडमध्ये; मणिपूरबाबत घेतला मोठा निर्णय

नेमकं काय घडलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंबलीचा पाच वर्षाचा संवैधानिक कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच पाकिस्तानची संसद बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. नॅशनल असेंबली संविधानाच्या आर्टिकल 58च्या नुसार भंग करण्यात आली आहे.

संसदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ अधिकृतरित्या 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार होता, असे या हालचालींबाबत नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून संसद भंग करण्याची शिफारीश केली होती.

Pakistan National Assembly Dissolved
Chhatrapati Sambhajinagar: पैशाच्या वादातून गोळीबार! भररस्त्यात तरुणाला संपवलं; छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ

आर्टिकल 58 नुसार राष्ट्रपतीने पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार 48 तासात संसद बरखास्त केली नाही तर 48 तासानंतर संसद आपोआपच भंग होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नॅशनल असेंब्ली वेळेआधी बरखास्त झाल्यास, पाकिस्तानचा निवडणूक आयोग 90 दिवसांच्या आत निवडणुका घेईल. नॅशनल असेंब्लीने आपला संवैधानिक कार्यकाळ पूर्ण केला असता तर 60 दिवसांच्या आत निवडणुका झाल्या असत्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com