

इम्रान खान यांच्या हत्येची अफवा
इम्रान खान तुरुंगात सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती
पीटीआय नेत्यांनी लोकांना भ्रमित न होण्याचं आवाहन केलं.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या झाल्याचं वृत्ताने खळबळ उडालीय. माजी पंतप्रधानांच्या हत्येच्या वृत्ताबद्दल माजी मंत्र्यानं मोठा खुलासा केलाय. पीटीआयचे माजी नेते फवाद चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना हत्येचं वृत्त फेटाळून लावले. इम्रान खान यांच्या निधनाच्या अफवा आधीही उठवण्यात आल्या होत्या. इम्रान खान तुरुंगात सुरक्षित आहेत, अशी माहिती फवाद चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलीय.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या वृत्ताने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान हे वृत्त खोटं असल्याची माहिती पीटीआय पक्षाचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी दिलीय. याआधीही इम्रान खान यांच्या निधनाच्या आणि हत्येची अफवा पसरवण्यात आली होती. अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी खोटं वृत्त प्रसारित केलंय,असं फवाद चौधरी म्हणालेत.
आज सकाळी सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या हत्येची बातमी व्हायरल होऊ लागली. अफगाणिस्तानमधील एका वृत्त वाहिनीनं सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यात credible sources चा दाखल्यानं इम्रान खान यांचा मृतदेह शव आदियाला तुरुंगातून हटवलं जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना २०२३ रोजी रावलपिंडीच्या आदियाला तुरुंगात ठेवण्यात आलंय. पाकिस्तानी लष्कर आणि तेथील सरकार इम्रान खान यांना त्रास देत आहे, असा आरोप केला जातोय.
त्याच दरम्यान आता वृत्त येत आहे, की त्यांना स्वतंत्र एका खोलीत बंद करण्यात आलंय. म्हणजेच, सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये ठेवण्यात आलंय. इतकेच काय कोणालाचा त्यांना भेटत येत नाहीये. त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा भेटू दिलं जात नाहीये. त्याच दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या हत्येचे वृत्त व्हायरल केलं जातं आहे. दरम्यान या वृत्ताला कोणताच अधिकृत दुजोरा देण्यात आला नाहीये. सुरक्षेच्या कारणांमुळे इम्रान खान यांना कोणालाच भेटू दिलं जात नाहीये.
एकाबाजुला लष्कर त्यांना कोणाची भेटू देत नाही, आणि दुसऱ्या बाजुला त्यांच्या हत्येचं वृत्त व्हायरल होत आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणी नुरीन खान, अलीमा खान आणि उजमा खान यांनी तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलंय. त्यांच्यासोबत काही पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.