Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पंचातारांकित हॉटेलमध्ये एका महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ महिने मुक्काम ठोकला होता. आता या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठी रक्कम जमा आल्याचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळले. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस आणि आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com