Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा

IMRAN KHAN DEATH RUMORS: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याबाबत आता जेल प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे.
Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? सत्य आलं समोर, जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा
Imran KhanSaam Tv
Published On

Summary -

  • सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या हत्या झाल्याची चर्चा होत आहे

  • या अफवेमुळे पीटीआय समर्थक आक्रमक झाले आहेत

  • अडियाला जेलबाहेर मोठी गर्दी करण्यात आली असून आंदोलन केले जात आहे

  • जेल प्रशासनाने खुलासा करत सांगितले की, 'इम्रान खान सुरक्षित आहेत'

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. ते रावलपिंडी येथील अडियाला जेलमध्ये असून याच ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला गेला. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इम्रान खान यांच्या हत्येचे वृत्त कळताच त्यांचा पक्ष असणाऱ्या पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरूवात केली. त्याचसोबत जेलच्या बाहेर मोठी गर्दी देखील करण्यात आली आहे. त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून जेल प्रशासनावरील दबाव वाढला आहे. यासर्व घडामोडींनंतर आता जेल प्रशासनाने मौन सोडत या घटनेबाबत मोठा खुलासा केला.

मंगळवारी इम्रान खान यांच्या राजकीय पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजे पीटीआयचे हजारो समर्थक जेलबाहेर जमले. जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांच्या प्रकृतीची माहिती द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. जेलबाहेर वाढती गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुरुंगाबाहेर शेकडो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत. इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, डॉ. उज्मा आणि नोरीन नियाझी यांनी इतर पक्षाच्या नेत्यांसह तुरुंगाजवळील फॅक्टरी नाका येथे धरणे आंदोलन केले होते. भावाला भेटू दिले जात नसल्यामुळे इम्रान खान यांच्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. जेल प्रशासनाने भावाला भेटायला परवानगी न दिल्यामुळे त्यांनी आंदोलन केले. भावाला भेटू दिले जात नसल्यामुळे त्यांच्यासोबत काही तरी चुकीचे घडले असावे असा दावा केला जात आहे.

Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? सत्य आलं समोर, जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा
Imran Khan Jailed: माजी PM इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, आणखीन १४ वर्षांचा तुरूंगवास; पत्नीही अटकेत

इमरान खान यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप अदियाला जेल प्रशासनाने फेटाळून लावला आहे. जेल प्रशासनाने इम्रान खान यांच्या मृत्यूच्या चर्चेनंतर याबाबत मोठा खुलासा केला. 'इम्रान खान यांचा मृत्यू झालेला नाही. तसंच त्यांची तब्येत देखील खराब झालेली नाही. ते हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही.', असा खुलासा जेल प्रशासनाने केला. तसंच इम्रान खान यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आले असल्याचा आरोप इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केला होता. पण जेल प्रशासनाने हा दावा देखील फेटाळून लावला. त्यांना दुसऱ्या कोणत्याही जेलमध्ये हलवण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसंच इम्रान खान यांच्याबाबत ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्या सर्व खोट्या असून अफवा आहेत असे देखील जेल प्रशानाने स्पष्ट केले.

Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? सत्य आलं समोर, जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा
Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?

सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या मृत्यूबद्दलच्या अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मे २०२५ मध्येही असेच खोटे दावे व्हायरल झाले होते. ज्यात माजी पंतप्रधानांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या तसंच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता असे म्हटले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नावाखाली तयार करण्यात आलेले एक प्रेस रिलीज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले होते. यामध्ये इम्रान खान यांचा मृत्यू झाल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. पण नंतर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इम्रान खान यांच्या मृत्यूचे वृत्त खोटं असल्याचे सांगितले होते.

Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? सत्य आलं समोर, जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा
Former PM Imran khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? माजी नेत्याचा मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com