Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Anant Garje Wife End Life: डॉक्टर गौरी गर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या मृत्यमागचे कारण सांगितले आहे. त्यावरून खळबळ उडाली आहे.
Dr Gauri Garge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Anant Garge Wife End LifeSaam Tv
Published On

Summary -

  • प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गौरी गर्जे यांचा मृत्यू ‘अनैसर्गिक’ असल्याचे नमूद

  • गळ्यावर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे

  • पती अनंत गर्जे आणि कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

  • अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी केली अटक

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची बायको डॉक्टर गौरी गर्जे-पालवे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गौरी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आता गौरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून गौरी यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. गळ्यावर दाब पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यात म्हटले आहे.

डॉ. राजेश ढेरे यांनी डॉक्टर गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदन अहवालाबाबत माहिती सांगितली. ते म्हणाले की, या प्राथमिक अहवालामध्ये ओपिनिअन रिझर्व्हड एव्हिडन्स ऑफ नेगेचर कम्प्रेशन ऑफ नेक असे लिहिले आहे. म्हणजे गौरी यांचा मृत्यू गळ्यावर दाब पडल्यामुळे झाला असावा. या शवविच्छेदन अहवालामध्ये गौरी यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्यावर शेरा देण्यात आला आहे. पण अंतिम शवविच्छेन अहवाल आल्यानंतर मृत्यूमागचं खरं कारण देखील स्पष्ट होईल.

Dr Gauri Garge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Anant Garge Case: पंकजा मुंडेंच्या पीएसह ३ जणांविरोधात गुन्हा, बायकोची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गौरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मारहाण केली जात असल्याचा देखील आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर आणखी काही जखमा, खुणा होत्या का? याची माहिती अंतिम शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलिस तपास करत आहे. त्यांनी या प्रकरणी गौरी यांचा नवरा अनंत गर्गेसह नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला.

Dr Gauri Garge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

मध्यरात्री १ वाजता अनंत गर्गेला पोलिसांनी अटक केली. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू पुरावे म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीम देखील घटनस्थळावरून पुरावे गोळा करत आहे. आज डॉक्टर गौरी यांच्या पार्थिवावर त्यांच्या सासरी पाथर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरी यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला.

Dr Gauri Garge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Gauri Garje Case: 'श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या', डॉक्टर गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com