PAचा फोन आला, पत्नीच्या आत्महत्येने आक्रोश; गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश

gauri garje case : गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंडे यांनी योग्य तपास करण्याचेही आदेश दिले आहेत.
pankaja munde
gauri garje case Saam tv
Published On

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या काही दिवसांतच त्यांच्या पत्नीने आयुष्य संपवलं आहे. मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वा. सुमारास माझा पी ए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पी ए च्या फोनवर आला . तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खुप धक्कादायक होती'.

pankaja munde
Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

'पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजु शकते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे.अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com