Pakistan Election 2024: देश आर्थिक संकटात; नवाझ शरिफांनी प्रचारात घातली 1 लाखाची कॅप, लोक म्हणाले...

Pakistan Election 2024 News: गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये निवडणूक प्रचार सुरू असून पुढील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असून ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
Pakistan Election 2024
Pakistan Election 2024Saam Digital
Published On

Pakistan Election 2024

गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये निवडणूक प्रचार सुरू असून पुढील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असून ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, निवडणूक प्रचारादरम्यान शरीफ अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, मात्र चर्चेच कारण निवडणूक किंवा दुसरं कोणतं नसून त्ंयाची एक लाख रुपयांची कॅप आहे.

नवाझ शरीफ यांच्या महागड्या कॅपने पाकिस्तानच्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. नवाझ शरीफ पंजाब प्रांतातील ननकाना साहिब जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीत त्यांनी एक लाख पाकिस्तानी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची कॅप घातली होती. शरीफ यांनी घातलेली ही टोपी महागडी असल्याने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. तर कॅपच्या काठावरील पट्टे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या झेंड्यासारखे दिसत होते. टोपीवरील पट्ट्यांचा रंगही अनेकांनी निदर्शनास आणून दिला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pakistan Election 2024
Manoj Jarange Patil: 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

गुच्ची कंपनीच्या नवाझ शरीफ यांच्या महागड्या टोपीची अनपेक्षित किंमत दाखवण्यासाठी लोकांनी सोशल मीडियावर किमतीची पावतीही दाखवली. शरीफ यांनी घातलेली 1 लाख रुपयांची टोपी पाकिस्तानमध्ये वादाचा विषय बनली आहे. कारण इंधन, वीज आणि अन्न यासारख्या मूलभूत सुविधांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे पाकिस्तानातील जनता आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तर नवाझ शरीफ यांच्यासारखे नेते अनपेक्षित महागड्या गोष्टी घेऊन मते मिळविण्यासाठी निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

Pakistan Election 2024
Maharashtra Fort : शिवप्रेमींसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांचा नामांकनासाठी UNESCO कडे प्रस्ताव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com