Shahid Afridi: भारताविरोधात शाहीद आफ्रिदीने गरळ ओकली, असदुद्दीन ओवैसींनी सुनावलंय

Shahid Afridi Controversial Statement: पाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन शाहीद आफ्रिदीने पुन्हा अकलेचे तारे तोडलेत. पाकड्यांच्या दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी त्याने भारताविरोधात विष ओकलंय. तो नेमकं काय म्हणालाय? आणि असदुद्दीन ओवैसींनी आफ्रिदीला कसं सुनावलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Shahid Afridi
Shahid Afridi Controversial Statementsaam tv
Published On

हे वाक्य नीट ऐका आणि या निर्लज्ज शाहीद आफ्रिदीचा चेहरा नीट निरखून पाहा. पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जीवावर निष्पाप लोकांचं हत्याकांड केलं. त्याचा साधा निषेधही न करता नीच प्रवृत्तीच्या आफ्रिदीने भारतीय सेनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. हा निर्लज्ज शाहीद आफ्रिदी एवढ्यावरच थांबला नाही तर पहलगाम हल्ल्याचं खापर त्याने भारतावरच फोडलय

Shahid Afridi
Pahalgam Attack: पहलगाम हल्ला घडवणारा सैनिक कोण? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

तर या वक्तव्याचा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी चांगलाच समाचार घेतलाय. नालायक शाहीद आफ्रिदी या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो.. त्याने वारंवार भारताविरोधात गरळ ओकलीय. तर आता त्याने सगळ्याच मर्यादा सोडून भारतच पाकड्यांना धमक्या देत असल्याचं म्हटलंय.

हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यामुळे हे पाकडे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबतही निर्लज्ज आणि नीचपणे वक्तव्य करणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. भारत सरकारनेही पाकड्यांची फक्त जलकोंडीच नाही तर क्रिडा क्षेत्र आणि आर्थिक कोंडी करण्यासाठीही रणनीती आखायला हवी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com