Pahalgam Attack: हल्ल्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये; आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लान उघड

Pahalgam Attack Plot Uncovered: पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला करण्यापूर्वी ७ दिवस आधीच दहशतवादी बैसरनमध्ये आले होते. त्यांनी ४ ठिकाणांना टार्गेट केले होते असं तपासातून उघड झाले.
Pahalgam Attack: हल्ल्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये; आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लान उघड
Pahalgam Terror AttackSaam tv
Published On

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. या हल्ल्याचा भारताकडून वेगाने तपास केला जात आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए या हल्ल्याचा तपास करत आहे. पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी बैसरनला दाखल झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. एकाच वेळी ४ ठिकाही हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्लान होता. या दहशतवाद्यांनी फक्त बैसरनच नाही तर इतर तीन पर्यटन स्थळे देखील लक्ष्य केली होती.

पहलगाममध्ये हल्ला करण्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगामध्ये दाखल झाले होते. एकाच वेळ ४ ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा प्लान होता. बैसरन व्हॅली, आरू घाटी, अमिझमेंट पार्क आणि बेताब घाटीमध्ये हल्ला करण्याचा त्यांचा प्लान होता. या चारही पर्यटनस्थळाची दहशतवाद्यांनी रेकी केली होती. पण सुरक्षाव्यवस्था अधिक असल्यामुळे इतर ३ ठिकाणी हल्ला करण्यात आला नव्हता. त्याठिकाणी हल्ला करण्याचे दहशतवाद्यांनी टाळले आहे. त्यांनी बैसरन घाटीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्यटकांवर बेछूट गोळीबार गेला यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला.

Pahalgam Attack: हल्ल्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये; आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लान उघड
Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर पाकची मुजोरी सुरुच, सलग आठव्या दिवशी गोळीबार, भारताकडून प्रत्युत्तर | VIDEO

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये संशयास्पद लोकांना ताब्यात घेतले जात आहे. हल्ल्यानंतर आतापर्यंत २,५०० हून अधिक संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १८६ लोकं अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. एनआयएने ८० ओव्हरग्राउंड कामगारांना देखील ताब्यात घेतले आहे. तपास यंत्रणा या ओव्हरग्राउंड कामगारांची देखील सतत चौकशी करत आहे.

Pahalgam Attack: हल्ल्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये; आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लान उघड
Pahalgam Attack: भारतीय मुस्लिमांचा राष्ट्रवाद; काश्मीरच्या विधानसभेत आमदार मेहराज मलिकने पाकड्यांना सुनावलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या चौकशीत आणि ओव्हरग्राउंड कामगारांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे होत आहेत. ताब्यात घेतलेल्या ओव्हरग्राउंड कामगारांच्या चौकशीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये उपस्थित असल्याचे उघड झाले. हल्ल्याच्या एक आठवडा आधी १५ एप्रिल रोजी हे दहशतवादी पहलगाममध्ये पोहोचले होते असे सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर केवळ बैसरन व्हॅलीच नाही तर पहलगाममधील इतर तीन पर्यटन स्थळे होती. या ठिकाणांची रेकीही त्यांनी केली होती. ही तीन ठिकाणे देखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केली होती.

Pahalgam Attack: हल्ल्याच्या ७ दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये; आणखी ४ ठिकाणं टार्गेटवर, खतरनाक प्लान उघड
Pahalgam Attack : पाकिस्तानी सैन्यात भयकंप; लष्कर प्रमुखाच्या विरोधात 5000 जवानांचा बंडाचा झेंडा, नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com