चोरांचा कलेक्टरलाचं उलट प्रश्न; जर घरात पैसे नव्हते तर...

जर पैसेच नाहीत तर...
चोरांचा कलेक्टरलाच उलटप्रश्न; जर घरात पैसेच नव्हते तर...
चोरांचा कलेक्टरलाच उलटप्रश्न; जर घरात पैसेच नव्हते तर...Saam Tv
Published On

देवास : मध्य प्रदेशच्या Madhya Pradesh देवास मध्ये चोरटयांनी एक अजब प्रकार केला आहे. चोर SDMच्या घरात चोरी करण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी SDM ला एक विचित्र पत्र लिहिले आता या पत्राची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हे देखील पहा-

वास्तविक, चोर एसडीएमच्या घरी चोरी करण्यासाठी आले होते तेव्हा बऱ्याच प्रयत्नांनंतर ते घरात शिरले, पण इतकी मेहनत करूनही, जेव्हा त्याला चोरी करण्यासारखे काही सापडले नाही, तेव्हा त्याने एसडीएमला पत्र लिहिले.

झालं असं की, काही चोरट्यांनी सिव्हिल लाईन्समध्ये असलेल्या SDM च्या घराला लक्ष्य केले. चोर जेव्हा कलेक्टरच्या घरात गेले, तेव्हा चोरांना घरात चोरी करण्यासारखी कोणतीही गोष्ट सापडली नाही. घरात काहीच नाही हे पाहून नंतर चोरटयांनी SDM च्या नावे एक पत्र सोडले. आणि त्यात लिहिले, "जेव्हा येथे पैसेच नाही. तर कुलूप लावण्याची गरजच काय आहे? कलेक्टर साहेब...'

चोरांचा कलेक्टरलाच उलटप्रश्न; जर घरात पैसेच नव्हते तर...
महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

माहितीनुसार, हे चोर चोरी करण्यासाठी SDM त्रिलोचन गौर Trilochan Gaur यांच्या देवासच्या सिव्हिल लाईन्समध्ये असलेल्या सरकारी घरात शिरले होते. त्रिलोचन गौर सध्या देवास जिल्ह्यातील खातेगावचे एसडीएम आहेत. तर सुमारे 15 दिवसांपासून ते देवास येथील त्यांच्या घरी आले नव्हते. परंतु काल काल रात्री ते घरी आले. तेव्हा त्यांनी पाहिले की घरातील सर्व सामान विखुरलेल्या अवस्थेत आहे. काही रोख आणि चांदीचे दागिने गायब आहेत. पोलिसांना त्यांनी आणि चिट्ठीबद्दल माहिती दिली. तर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com