महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

हे सरकार आल्यापासून राज्यात आपत्तीच आपत्ती
महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला
महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोलाSaam Tv

संभाजी थोरात

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपूर घटनेच्या Lakhimpur Violence निषेधार्थ महाराष्ट्र बंदची Maharashtra Bandh हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून आज राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध असल्याचं चंद्रकांत पाटील Chandrakant Patil On Maharashtra Bandh Today यांनी म्हटलं आहे.

हे देखील पहा-

"लखीमपूर मध्ये घडलेल्या घटनेपासून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आत्ता आरोपीला पकडला आहे. तरीही महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलाय. बंदला जास्त प्रतिसाद नाही. मात्र, घाबरून अनेक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले. निसर्गाला याचे सरकार मान्य नाही. हे सरकार आल्यापासून राज्यात आपत्तीच आपत्ती आली आहे."

महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ राजकारण; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला
केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करावी- नाना पटोले

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न कमी आहेत का? अतिवृष्टी झाल्याने पीकच नाही तर जमिनीही गेल्या आहेत. त्यांना मदत नाही. इथल्याना मदत नाही. लखीमपूर मधल्या घटनेनंतर उत्तर प्रदेश बंद नाही. महाराष्ट्र बंद राजकीय आहे. बंदच्या भूमिकेचा निषेध आहे. असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र बंदचा निषेध केला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com