पंजाबच्या नवीन मंत्रीमंडळात 6 नवीन चेहऱ्यांना संधी

चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) सरकारचा पंजाबमध्ये (Panjab Politics) विस्तार झाला आहे.
पंजाबच्या नवीन मंत्रीमंडळात 6 नवीन चेहऱ्यांना संधी
पंजाबच्या नवीन मंत्रीमंडळात 6 नवीन चेहऱ्यांना संधीTwitter/ @ANI
Published On

पंजाब: चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) सरकारचा पंजाबमध्ये (Panjab Politics) विस्तार झाला आहे. आज 5 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सहा कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) सरकारमध्ये मंत्री नव्हते. यामधील नऊ मंत्री पूर्वीच्या अमरिंदर सरकारमध्ये मंत्री होते. शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये राणा गुरजीत सिंह यांचेही नाव समाविष्ट आहे, परंतु काही काँग्रेस आमदारांनी त्यांना आपला विरोध व्यक्त केला आहे.

पंजाबच्या नवीन मंत्रीमंडळात 6 नवीन चेहऱ्यांना संधी
आगामी काळात प्रदर्शित होणारे चित्रपट पाहा एका क्लिक वर

6 आमदारांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना पत्र लिहून त्यांच्या जागी अनुसूचित जातीच्या आमदाराला जागा देण्याबाबत बोलले होते. राणा गुरजीत सिंग कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. परंतु 2018 मध्ये बेकायदा खाणकाम केल्याच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. गुरजीत सिंग हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात नवज्योतसिंग सिद्धू यांचे जवळचे कुलजीत नागरा यांना हटवण्यात आले आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर यांनी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर देशात राजकीय वर्तुळात मोठा भुकंप झाला होता. त्यानंतर नविन मुख्यमंत्री म्हणून कोणाचं नाव येणार याविषयी चर्चा होती. त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात झाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com