Bathinda Military Station Firing: बठिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये गोळी लागल्याने आणखी एका जवानाचा मृत्यू, हे धक्कादायक कारण आले समोर!

Punjab Firing News: शस्त्रास्त्रे सांभाळत असताना हा अपघात झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
Bathinda Military Station Firing
Bathinda Military Station FiringSaam Tv
Published On

Punjab News: पंजाबच्या बठिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये (Bathinda Military Station) गोळी लागल्याने आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) या घटनेला अपघात असल्याचे सांगितले. शस्त्रास्त्रे सांभाळत असताना हा अपघात झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

बुधवारीच बठिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये चार जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका जवानाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास लष्कराकडून सुरु आहे.

Bathinda Military Station Firing
Beed Crime News: मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या, बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

बठिंडा कँट पोलिस स्टेशनचे एसएचओ गुरदीप सिंग यांनी सांगितले की, 'पंजाबमधील बठिंडा येथे बुधवारी रात्री एका लष्करी जवानाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला. या जवानाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती त्यालाच लागली. यामध्ये या जवानाचा मृत्यू झाला. या शहीद जवानाचे नाव लघू राज शंकर असे आहे.

Bathinda Military Station Firing
Sanjay Raut on CM Shinde : मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांची खोचक टीका

या घटनेबाबत भारतीय लष्कराने सांगितले की, बुधवारी रात्री बठिंडा मिलिट्री स्टेशनवर झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. हा जवान त्याच्या सेवा शस्त्रासह सेन्ट्री ड्युटीवर होता. त्यावेळी जवानाच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि ती त्यालाच लागली.

अपघातानंतर लगेचच जवानाला तातडीने लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान या जवानाचा मृत्यू झाला. हा जवान 11 एप्रिल रोजी रजेवरून परतला होता. बुधवारी बठिंडा मिलिट्री स्टेशनवर घडलेल्या घटनेशी या घटनेचा काहीही संबंध नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Bathinda Military Station Firing
Punjab Road Accident : देवदर्शनाची इच्छा अपूर्ण राहिली; भरधाव ट्रकनं 8 भाविकांना चिरडलं

दरम्यान, पंजाबमधील बठिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला. लष्कराच्या निवेदनानुसार, बुधवारी पहाटे ४.३० वाजता दोन व्यक्तींनी तोफखाना युनिटमधील मेसच्या मागे असलेल्या बॅरेकजवळ झोपलेल्या चार जवानांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये जवानांचा मृत्यू झाला.

गोळीबार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी चेहरा झाकला होता आणि त्यांच्या हातामध्ये रायफल होती. याप्रकरणी बठिंडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तसंच लष्कराकडून देखील या घटनेचा तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com