Sanjay Raut on CM Shinde : मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांची खोचक टीका

संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचे स्पष्ट केले आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट याची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. त्या घटनाक्रमाबाबत अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असं विधान केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी आपली प्रतिकिया केली दिली आहे.  (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Mumbai News : 'विधवा' नव्हे 'गंगा भागिरथी' शब्द वापरावा; महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा प्रस्ताव

संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही आले होते आणि आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करत होते. मला अटकेची भीती वाटत आहे असं म्हणत होते, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे जे म्हणाले तेच शिंदे यांनी मला देखील त्यावेळी सांगितलं होतं. मला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही काहीही कराआणि आघाडी तोडा, अशी विनंती शिंदे यांनी केली होती. मी म्हटलं तुम्ही तुरुंगात का जाणार आहात? तुम्हाला तुरुंगात का पाठवणार? मी त्यांना वारंवार समजावत होतो आपण प्रसंगांना सामोरे जाऊ आपण लढणारे लोक आहोत आपण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. मी त्यांना सांगितलं माझ्यावर सुद्धा असा प्रसंग येईल पण मी अटकेच्या तयारीत आहे. मला अटक करण्यासाठी आले तर मी त्यांना सांगेल की मला थांबू नका अटक करा. असं संजय राऊत म्हणाले. (Latest Political News)

Sanjay Raut News
Akola News : देवेंद्र फडणवीसांचा दाैरा अन् ठाकरेंच्या आमदारासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; अकाेल्यात नेमकं काय घडलं

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

चाळीस आमदार हे फक्त पैशांसाठी आणि त्यांच्या जागेसाठी गेलेत. सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. आपण भाजपसोबत जाऊया नाहीतर मला अटक होईल असे ते घरी येऊन म्हणाले होते असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com