Mumbai News : 'विधवा' नव्हे 'गंगा भागिरथी' शब्द वापरावा; महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी 'दिव्यांग' ही संकल्पाना जाहीर केली होती.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSaam TV
Published On

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी 'दिव्यांग' ही संकल्पाना जाहीर केली होती. याच पार्श्वभूमीवर आता विधवांना गंगा भागीरथी (गं.भा.) म्हणावे, यासाठी राज्य सरकारने हालचारी सुरु केल्या आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावरुन आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

मंगलप्रभात यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशान म्हटलं की, समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. (Latest Political News)

Mangal Prabhat Lodha
Amit Shah News: मुंबईत भाजप नेत्यांसोबत अमित शाहांची महत्त्वाची बैठक; 'मिशन 45'आणि बीएमसी निवडणुकीचा आढावा घेणार

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंग ऐवजी "दिव्यांग' ही संकल्पना जाहीर केलेली असून यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन यातही आमूलाग्र बदल झालेले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी गंगा भागिरथी ( गं.भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी.

Mangal Prabhat Lodha
Dog Attack on Boy: नागपुरात भटक्या कुत्र्यांचा 3 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

लेखिका संध्या नरे-पवार यांनी याविषयी आपलं मत मांडताना म्हटलं की, केवळ आजच (जोडीदाराच्या निधनानंतर) नाही तर लग्न झाल्यापासून गेली तीस वर्ष मी माझ्या नावाआधी श्रीमतीच लावत आहे. सौ. या उपाधीला मी लग्न झाल्यापासून कायम विरोध केला आहे. आधी सौभाग्यवती हे बिरुद गेलं पाहिजे. म्हणजे मग पुढचे विधवा, गंगा भागीरथी, अर्धांगिनी, पूर्णांगिनी हे खेळ संपतील. एक पुरुष आयुष्यात आहे म्हणून स्री सौभाग्यवती नाही किंवा पुरुष आयुष्यात नाही म्हणून ती दुर्भाग्यवती नाही.

सौ. ही उपाधी विषमतावादी आहे. शासनामध्ये हिंमत असेल तर सौ ही उपाधी काढण्याचा व सगळ्याच स्त्रियांसाठी श्रीमती ही उपाधी लावण्याचा जीआर काढावा. यांना काही कामं राहिलेली नाहीत बाईच्या कपाळाच्या उठाठेवी करण्याशिवाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com