Old Women Viral Video: सूर्य कोपलेला अन् खुर्चीच्या आधारे चप्पल न घालता 'निखाऱ्या'वर चालणारी आजी...VIDEO पाहून तुमचा जीव तीळ तीळ तुटेल

Old Women Viral Video: व्हिडीओतील आजी तिच्या 3000 रुपये पेन्शनसाठी स्टेट बँक इंडियामध्ये निघाली आहे.
Viral Video
Viral Video Saam TV
Published On

Old Women Viral Video : एका वृद्ध महिलेचा भर उन्हात अनवाणी चालतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील या व्हिडीओची दखल घेतली आहे. वृद्ध महिला तिच्या पेन्शनसाठी भर उन्हात घरातून बाहेर पडली आहे. महिलेचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओतील आजी तिच्या 3000 रुपये पेन्शनसाठी स्टेट बँक इंडियामध्ये निघाली आहे. पण घरापासून बँकेपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. कारण वरुन सूर्य आग ओकत असताना ही आजी घरातून बाहेर पडली होती. पायात चप्पल नसताना निखाऱ्यासारख्या तापलेल्या रस्त्यांवरून ही आजी निघाली होती. वाढलेल्या वयामुळे आजीला नीट चालताही येत नाही. त्यामुळे तिने मोडलेल्या खुर्चीचा आधार घेतला.  (Viral Video

Viral Video
Accident CCTV Footage: बाईकची घोड्याला जोरदार धडक! काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्या हरिजन असं या 70 वर्षीय आजीचं नाव आहे. ओडिशाच्या झारीगााव येथील एसबीआय शाखेत ही महिला पेन्शन घेण्यासाठी जात होती. वाढलेल्या वयामुळे महिलेचे फिंगर प्रिंट मॅच होत नसल्याने तिला पेन्शनचे पैसे काढण्यात अडचण येत होती, म्हणून ती बँकेत निघाली होती. (Latest Marathi News)

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, वृद्ध महिलेचा व्हिडीओ पाहून दु:ख झालं. सूर्या यांचे फिंगर प्रिंट मॅच होत नसल्याने त्यांना बँकेत यावं लागलं. मात्र आता बँकेने तातडीने सूर्या यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले आहेत. याशिवाय पुढील महिन्यापासून महिलेला तिची पेन्शन घरपोच केली जाईल. तसेच महिलेला व्हीलचेअर देणार असल्याचंही बँकेने जाहीर केलं आहे.

Viral Video
Kalyan Viral Video: मौत का कुआं! ट्रॅफिकमधून मार्ग काढण्यासाठी नागरिक चक्क पाईपमध्ये शिरले, कल्याणमधील व्हिडियो व्हायरल

निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र विस्तीय सेवा विभाग (DFS) आणि एसबीआयने अशावेळी माणूसकीने काम केले पाहिजे. या विभागात कुणी बँक मित्र नाही का? असा प्रश्नही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com