Odisha News: ओडिशामध्ये झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताने (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या अपघाताला चार दिवस पूर्ण झाले असून देश या अपघाताच्या दु:खातून सावरत आहे. या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 1100 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेत. या सर्व प्रवाशांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघाताचा तपास रेल्वेकडून (Indian Railway) सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामधील तिन्ही रेल्वे चालकांचे काय झालं असावं? ते सध्या कुठे आहेत? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये दोन रेल्वेचे लोको पायलट म्हणजेच ड्रायव्हर आणि गार्ड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ओडिशातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर या अपघातामध्ये इंजिन ड्रायव्हर आणि मालगाडीचा गार्ड बचावला आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, 'कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि गार्ड यांच्यासह बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचा ड्रायव्हर आणि गार्ड यांचा समावेश जखमींच्या यादीत होता. या सर्वांवर उपचार सुरु आहेत.'
या भीषण रेल्वे अपघाताचा तपास सुरु आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती रेल्वेकडून करण्यात आलेल्या तपासातून समोर आली आहे. रेल्वेकडून या चालकांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी देखील सिग्नल यंत्रणेतील बिघाड हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याची माहिती दिली. तसंच रेल्वे ज्या रुळावरुन गेली तो रुळ गंजला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, रेल्वेकडून करण्यात आलेल्या या अपघाताच्या तपासातून धक्कदायक माहिती समोर आली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेल्या या खुलाशामुळे बालासोर दुर्घटना हा अपघात नसून घातपात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंटरलॉकिंग सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेपामागील हेतू शोधण्यासाठी सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.