आता जपान-कोरियात युद्ध पेटणार? किम जोंग यांनी डागले मिसाईल

Kim Jong Un North Korea latest news : उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याच्या संशयामुळे तणाव वाढला आहे. जपानने आणीबाणीचा इशारा जारी केला असून पूर्व आशियात युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
North Korea Kim Jong Un
North Korea Kim Jong UnSaam
Published On

North Korea missile launch towards Japan latest news : अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा आखातातील संघर्ष मिटण्याची चिन्हं असताना आता पूर्व आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे...कारण उत्तर कोरियानं जपानची धडकी भरवणारी कृती केलीय.. ही कृती नेमकी काय आहे...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात छेडलेलं युद्ध 15 दिवसांसाठी थांबलं... मात्र त्याच वेळी उत्तर कोरियाचा हुकुमशाह किंम जोंग उनने जगाचं टेन्शन वाढवलंय... कारण उत्तर कोरियानं धडकी भरवणारे बॅलेस्टिक मिसाईल जपानच्या दिशेनं डागल्याचा संशय व्यक्त केला जातोय...

उत्तर कोरियाकडून जपानच्या दिशेनं क्षेपणास्त्र लाँच केल्याचा संशय असल्यानं जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने नागरिकांसाठी अलर्ट जारी केलाय. जपान उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रविषयक हालचालींना खूप गांभीर्यानं घेतो.. जेव्हा उत्तर कोरिया क्षेपणास्त्र डागतो. तेव्हा जपानमध्ये पंतप्रधान कार्यालय आणीबाणीचा इशारा देते.. या इशाऱ्यानं सरकारचं आपत्ती व्यवस्थापन पथक सक्रीय होतं... मंत्रालय, सुरक्षा यंत्रणा माहिती गोळा करतात आणि तातडीच्या उपाययोजना केल्या जातात

North Korea Kim Jong Un
LPG गॅस सिलिंडरचे नियम बदलले, १ जुलैपर्यंत हे काम कराच अन्यथा बुकिंग नाही, PNG आता अनिवार्य

खरं तर जपान आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाला ऐतिहासिक वादाची किनार आहे..1910 ते 1945 या काळात जपानचं कोरियावर वर्चस्व होतं.. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकून विध्वंस घडवला.. 1948 मध्ये कोरियाचे दोन तुकडे झाले... त्यानंतर उत्तर कोरियावर सोव्हियत युनियनचं वर्चस्व होतं.. तर दक्षिण कोरियावर अमेरिकेचं... पुढे याच विभाजनावरुन कोरियात युद्ध पेटलं... त्यात लाखो कोरियन लोकांचा मृत्यू झाला.. मात्र जपान आणि दक्षिण कोरिया हा अमेरिकाधार्जिणी भूमिका घेत असल्यानं उत्तर कोरियाचा जपानवर राग आहे..

North Korea Kim Jong Un
MPSC Result : मोठी बातमी! MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल

2006 मध्ये पहिल्यांदा उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचणी केली... त्यानंतर अमेरिकेनं उत्तर कोरियावर निर्बंध लादले.. मात्र त्याला न जुमानता उत्तर कोरियानं अण्वस्त्रं चाचण्यांची मालिका सुरुच ठेवली... एवढंच नाही तर किम जोंग उनच्या नेतृत्वात उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बचीही चाचणी केलीय.. तर गेल्या 8 वर्षात उत्तर कोरिया जपानच्या समुद्रात सातत्यानं क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत आहे. गेल्याच महिन्यात उत्तर कोरियानं दक्षिण कोरिया आणि जपानच्या दिशेनं समुद्रात 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती.. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र डागल्यानं आखाती देशानंतर कोरिया आणि जपानमध्ये युद्ध भडकणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय..

North Korea Kim Jong Un
इकडे इराण-अमेरिका युद्धाला ब्रेक, तिकडे किम जोंगने मिसाइल डागले, कोरियात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com