AAP: "रातोरात कुणी राष्ट्रीय पक्ष बनत नाही, 'आप'ला आणखी १५-२० वर्षे मेहनत करावी लागेल"- प्रशांत किशोर

Prashant Kishore Latest News: मोदींची लोकप्रियता कायम आहे, परंतु बंगालमध्ये भाजपाला पराभव स्विकारावा लागला त्यामुळे लोकप्रिय असूनही कोणीही निवडणूक हरू शकतो, असं ते म्हणाले.
"No one becomes a national party overnight, AAP will have to work hard for another 15-20 years" - Prashant Kishor
"No one becomes a national party overnight, AAP will have to work hard for another 15-20 years" - Prashant KishorSaam TV
Published On

मुंबई: रातोरात कुणी राष्ट्रीय पक्ष बनत नाही, त्यासाठी खडतर मेहनत करावी लागते असं वक्तव्यं राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलं आहे, आम आदमी पक्षाच्या पंजाब विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत व्यक्य केलयं, एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील ते बोलत होते. एक किंवा दोन राज्यांतील निवडणुका जिंकल्यानंतर मजबूत पक्ष म्हणून उदयास येणं ही एक गोष्ट आहे आणि लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) जिंकणं ही दुसरी गोष्ट आहे, असं प्रशांत किशोर (Prashant Kishore) म्हणाले. आम आदमी पक्षाच्या वाढत्या आलेखावर देशभरात चर्चा सुरु आहे की, पंजाब निवडणुकीतील (Punjab Elections) विजयानंतर भाजप (BJP) आणि काँग्रेसला (Congress) आप हा राष्ट्रीय पर्याय आहे, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपला (Aam Admi Party) फक्त 27 लाख मते मिळाली, लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला 20 कोटींहून अधिक मतांची आवश्यकता आहे, जे आतापर्यंत फक्त भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनेच मिळवले आहे असं प्रशांत किशोर म्हणाले. (AAP will take 15-20 years to become a pan-India party, can’t happen overnight Said Prashant Kishor)

हे देखील पहा -

प्रशांत किशोर म्हणाले की, “सैद्धांतिकदृष्ट्या, कोणताही पक्ष राष्ट्रीय पक्ष बनू शकतो, परंतु जर तुम्ही ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास, केवळ भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष संपूर्ण भारतातील पक्ष (राष्ट्रीय पक्ष) म्हणून उदयास येऊ शकले आहेत. याचा अर्थ असा नाही की इतर पक्ष भारतभरात पोहोचू शकत नाही. तेही करु शकतात पण, त्यासाठी किमान 15-20 वर्षे सतत प्रयत्न करावे लागतील. असा बदल एका रात्रीत येऊ शकत नाही असं मत किशोर यांनी व्यक्त केलं.

प्रशांत किशोर यांचं हे वक्तव्यं पंजाब निवडणुकीत 'आप'ने मिळवलेल्या एकहाती सत्तेच्या पार्श्वभूमीवर आलं आहे. आपच्या पंजाबमधील विजयामुळे इतर राज्यांमध्येही आपची पक्षबांधणीची मालिका सुरू झाली आहे. विशेषत: जेथे काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे त्याठिकाणी आप जोर लावतेय. आपने आधीच जाहीर केलं आहे की, ते गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहेत, जेथे या वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत. पंजाबच्या शेजारच्या हरियाणा या राज्यात त्यांचं अस्तित्व आधीच जाणवू लागलं आहे, या राज्यात काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे आणि 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. पंजाबच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर AAP ची वाढलेली ताकद आणि राष्ट्रीय प्रभाव यामुळे आप हा भाजप आणि कॉंग्रेसला पर्याय ठरु शकतो अशी चर्चा आहे.

"No one becomes a national party overnight, AAP will have to work hard for another 15-20 years" - Prashant Kishor
नाणार गाव वगळून ग्रीन रिफायनरी प्रकल्प ठरलेल्या जागेवरच होणार - नितेश राणे

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील अग्रगण्य लोकप्रिय चेहरा आहेत" यावर त्यांचा विश्वास आहे का, असे विचारले असता किशोर म्हणाले की मोदींची लोकप्रियता कायम आहे, परंतु बंगालमध्ये भाजपाला पराभव स्विकारावा लागला त्यामुळे लोकप्रिय असूनही कोणीही निवडणूक हरू शकतो, असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील निकालाबाबत ते म्हणाले की, अखिलेश यादव यांची कामगिरी हे दुसरे उदाहरण आहे, त्यांच्या रॅलींना मोठी गर्दी झाली परंतु जवळपास 30 टक्के मतं मिळूनही ते निवडणूक जिंकू शकले नाहीत.

"No one becomes a national party overnight, AAP will have to work hard for another 15-20 years" - Prashant Kishor
केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती; नाना पटोलेंची टीका

महागाई आणि बेरोजगारी हे मतदानाचे मुद्दे नसल्याचा युक्तिवादही किशोर यांनी नाकारला आहे. ते म्हणाले की, जर एखाद्या पक्षाला 38 टक्के मते मिळाली तर संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे असं समजू नये, कारण त्यांना 100 पैकी केवळ 38 लोकांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले की 100 पैकी 62 लोकांसाठी महागाई आणि बेरोजगारी हे मोठे प्रश्न आहेत, परंतु हे 62 मतदार त्यांच्या मतदानाच्या पद्धतीमध्ये एकसंध आणि संघटीत नाहीत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com