Delhi odd even : दिल्लीत सध्या तरी 'ऑड-इव्हन' नाहीच!, केजरीवाल सरकारनं नेमकं काय कारण दिलं?

Delhi Pollution : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत आधीपेक्षा काही प्रमाणात सुधारणा झाल्याने ऑड-इव्हन नियम लागू होणार नाही.
Delhi odd even
Delhi odd evenSaam tv
Published On

Delhi Pollution, odd even Rule :

दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत आधीपेक्षा काही प्रमाणात सुधारणा झाल्याने ऑड-इव्हन नियम लागू होणार नाही. दिल्ली सरकारनं ही माहिती दिली आहे. ऑड-इव्हन नियम लागू करण्याबाबतची योजना पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

वाढत्या वायू प्रदूषणानं दिल्लीकरांचा श्वास कोंडला होता. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ऑड-इव्हन नियम लागू करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते. १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, आता हा नियम लागू करण्यात येणार नाही, असे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत काल रात्रीपासून हवामानात बदल झाला आहे. पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यामुळे ऑड-इव्हन नियम लागू करण्यात येणार नाही. दिवाळीनंतर आढावा बैठक होईल आणि त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे राय यांनी स्पष्ट केले.

दिल्ली - एनसीआरमध्ये मागील आठवडाभरातून वायू प्रदूषण वाढले आहे. हवेची गुणवत्ता पातळी म्हणजेच AQI ४५० च्या पल्याड पोहोचला होता. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. १३ नोव्हेंबरपासून ऑड -इव्हन नियम लागू करण्याची घोषणाही केली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये पडलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. हवेची गुणवत्ता पातळी ३०० वर पोहोचली, असे सांगण्यात येत आहे.

Delhi odd even
Delhi Pollution Update : दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी सूचवला उपाय, VIDEO शेअर करत म्हटलं...

ऑड-इव्हन नियम काय आहे?

ऑड-इव्हन नियमाचा संबंध थेट राजधानी दिल्लीत धावणाऱ्या वाहनांशी येतो. विषम तारखांना विषम (कारच्या क्रमांकामधील अखेरचा अंक १, ३, ५, ७, ९) संख्या असलेल्या कार आणि सम तारखांना सम संख्या (वाहन क्रमांकामधील अखेरचा अंक ०, २, ४, ६, ८) असलेल्या कार धावतील.

आधीही तिनदा लागू केला होता नियम

वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दिल्ली सरकारने याआधी तिनदा शहरात ऑड - इव्हन नियम लागू केला होता. सर्वात आधी १ ते १५ जानेवारी २०१६ रोजी लागू केला होता. त्यानंतर १५ ते ३० एप्रिल २०१६ मध्ये, २०१९ मध्ये ४ ते १५ नोव्हेंबर रोजी हा नियम लागू केला होता.

Delhi odd even
Delhi, Mumbai Pollution: प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीत पाडणार कृत्रिम पाऊस, मुंबईतील स्थिती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com