Delhi, Mumbai Pollution: प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्लीत पाडणार कृत्रिम पाऊस, मुंबईतील स्थिती काय?

Delhi, Mumbai Pollution: प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत असून विषारी हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरत आहे. यावरून दिल्ली न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकार आता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे
Air Pollution
Air Pollution Saam Digital
Published On

Delhi, Mumbai Pollution

दिल्ली गेल्या कित्येक दिवसांपासून दाट धुक्यात गायब झाली आहे. सरकारच्या लाख प्रयत्नांनतरही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही. प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत असून विषारी हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरत आहे. यावरून दिल्ली न्यायालयाने फटकारल्यानंतर सरकार आता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. २० नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आयआयटी कानपूरच्या संशोधकांची एक बैठक बोलावली होती. आकाशात ढग आणि वातावरण दमट असते त्यावेळीच क्लाउड सीडिंगचा प्रयोग केला जाऊ शकतो, अशी माहिती संशोधकांनी यावेळी दिली. दरम्यान २० आणि २१ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली परिसरात अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी संशोधकांना दिली आहे. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती गोपाल राय यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान हवेच्या प्रदूषणामुळे मुंबईकरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच बांधकाम साईटवर स्मोग गन स्प्रिंकलर बसवावेत, मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके तयार करावीत, पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, रस्ते धुण्यासाठी १००० टँकर्स मागवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसेच अर्बन फॉरेस्ट वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

Air Pollution
Surrogate Mother Maternity Leave: सरोगेट मातांनाही मातृत्व रजेचा अधिकार, हायकोर्टाचा निर्वाळा

कृत्रिम पावसामुळे प्रदूषण कमी होईल का?

भारतात याआधी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र यातील बरेच प्रयोग हे दुष्काळाच्या परिस्थितीत करण्यात आलेले आहेत. प्रदूषणावरचा हा पहिलाच प्रयोग आहे. हवेत असलेले दूषित कण जमिनीवर आणण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. मात्र यांचा परिणाम किती होईल याबाबत संशोधकांची वेगवेगळी मते आहेत.

Air Pollution
Crime News: हॉटेलात आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com