Nitish kumar: 'इतक्या मुलांना कोण जन्म देतं का? लालू प्रसाद यादवांवर टीका करताना नितीश कुमारांची जीभ घसरली

Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कटिहारच्या दादखोडा तालुक्यात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. येथील जेडीयू उमेदवार दुलालचंद गोस्वामी यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यांच्या मुलांवरुन टीका केली.
Nitish kumar
Nitish kumarsakal

Nitish kumar Slams Lalu Prasad Yadav: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कटिहार येथे आयोजित जाहीर सभेत राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुलांवरुन टीका केली. लालू प्रसाद यादव यांनी खूप जन्म दिला...इतक्या मुलांना जन्म कोणी देतं का?

अनेक मुलांना जन्म दिल्यावरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर टीका केली. लालू-राबडींना इतकी मुले असावीत का? इतक्या मुलांना जन्म द्यावा का? असं म्हणत लालू प्रसाद यांनी मुस्लिमांना फसवल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे कटिहारच्या दादखोडा तालुक्यात आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. येथील जेडीयू उमेदवार दुलालचंद गोस्वामी यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यांच्या मुलांवरुन टीका केली. दरम्यान लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीने पाटीलपूत्र येथून मीसा भारती आणि सारण लोकसभा जागेवर रोहिणी आचार्य यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. यावरून टीका करताना नितीश कुमार यांची जीभ घसरलीय.

लालू प्रसाद यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव हे आधी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याकडे पर्यावरण खाते होते. बिहारमध्ये १९ वर्ष सत्तेत असणाऱ्या नितीश कुमार यांना तेजस्वी यादव जबर टक्कर देत आहे. दरम्यान आरजेडी सध्या इंडिया आघाडीचा प्रचार करत आहे. दरम्यान सभेत बोलताना नितीश कुमार यांनी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बिहारमध्ये पूर्वी जंगलराज होते. परंतु जेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याने बिहारमध्ये विकास झाला असल्याचे ते म्हणाले. शिक्षण असो, रस्ते असो, रुग्णालय असो, घरे असोत, सर्वच क्षेत्रात विकास झालाय. नितीश कुमार यांनी लालू-राबडी देवी यांच्या १५ वर्षांच्या राजवटीची तुलना जंगलराजशी केली.

Nitish kumar
Lalu Prasad Yadav: ऐन लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, न्यायालयाने जारी केलं अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com