Nigeria Accident: पेट्रोल टँकरची १७ वाहनांना धडक, नंतर भीषण स्फोट, १८ जण ठार

Gas Tanker Accident 18 Died : दक्षिण नायजेरियात या महिन्यात हा दुसरा टँकर स्फोट असल्याची घटना घडली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झालाय. याआधीही अलीकडेच पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन ९८ जणांचा मृत्यू झाला होता.
Nigeria Accident
Gas Tanker Accident 18 Died AP
Published On

दक्षिण नायजेरियात गॅसोलीन टँकरचा स्फोट होऊन १८ जणांचा मृत्यू झालाय तर १० जखमी झालेत. नायजेरियाच्या रस्ता सुरक्षा संघटनेने शनिवारी या अपघाताची माहिती दिलीय. या दुर्घटना दक्षिण-पूर्वी एनुगूमध्ये एनुगू-ओनित्शान एक्स्प्रेसवेवर झालीय. मिळालेल्या माहितीनुसार टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला त्यानंतर टँकरने १७ वाहनांना धडक दिली, त्यात मोठा स्फोट झाला.

Nigeria Accident
Telngana Accident: ट्रकवरून ऑटोवर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड; चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ७ जणांचा गेला जीव| Video

सेक्युरिटी कॉर्प्सच्या बचाव पथकाचे प्रवक्ते ओलुसेगुन ओगुंगबेमाइड यांनी सांगितले की, आगीत जास्त प्रमाणात भाजल्या गेल्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. तसेच १० जखमींव्यतिरिक्त, बचाव कर्मचाऱ्यांनी इतर तिघांना वाचवले. मालाची वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे प्रणाली नसल्यामुळे नायजेरियातील रस्त्यांवर असे जीवघेणे ट्रक अपघात होणं सामान्य आहेत. दरम्यान याआधीही असाच एक अपघात घडला होता. ही दुर्घटना उत्तर- मध्य नायजेरियामध्ये नायझर राज्य सुलेजा परिसरात घडली होती. त्यावेळी पेट्रोल टँकरच्या स्फोटात ९८ जणांचा मृत्यू झाला होता.

Nigeria Accident
MP Bus Accident : बापरे! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली, ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये पेट्रोल भरत असताना हा अपघात झाला. त्यावेळी पेट्रोल काढण्यासाठी अनेक मजूर काम करत होते त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा स्फोट झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गॅसोलीन काढून टाकणे आणि मृत्यूला कारणीभूत असलेल्या इतर पद्धतींविरुद्ध देशव्यापी मोहीम सुरू केली.

तेलंगणात मोठा अपघात

तेलंगणातील वारंगल-मामुनुरु रोडवर ट्रक आणि ऑटोरिक्षाचा भीषण अपघात झालाय. यात एका मुलासह ७ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा ट्रक ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हा अपघात घडला. यात ७ जणांचा मृत्यू झालाय. रेल्वे रुळ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका ट्रकने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रक पलटी झाला आणि लोखंडी सळ्या ऑटोरिक्षावर पडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com