Telngana Accident: ट्रकवरून ऑटोवर पडले रेल्वे ट्रॅकचे रॉड; चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ७ जणांचा गेला जीव| Video

Telangana Accident: तेलंगणातील वारंगल येथे रेल्वे रुळ टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी रॉडने भरलेल्या एक ट्रकने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान लोखंडी रॉड ऑटोरिक्षावर पडल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Truck And Auto Accident
Telangana AccidentTwitter
Published On

तेलंगणातील वारंगल-मामुनुरु रोडवर भीषण अपघात झालाय. या मार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ एका ट्रक आणि दोन ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून यात एका मुलासह ७ जणांचा मृत्यू झालाय. ६ जण जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा ट्रक ऑटोरिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हा अपघात घडला असून यात ७ जणांचा मृत्यू झालाय.

रेल्वे रुळ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या एका ट्रकने दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोखंडी सळ्या ऑटोरिक्षावर पडल्या यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यात चार महिला असून त्यांना एक मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

Truck And Auto Accident
Pune Dumper Accident: भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं; डंपरखाली येत दोन तरुणींचा मृत्यू

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या अपघाताबाबत माहिती देतांना पोलीस अधिकारी म्हणाले, राष्ट्रीय राजमार्गवर मामुनूरजवळ एक भीषण अपघात झालाय. या अपघातात ७ जणांचा जीव गेलाय. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातासाठी चालक कारणीभूत आहे. त्याने दारूचं सेवन केलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Truck And Auto Accident
NCP Leader: पक्षात हे प्रकार चालणार नाहीत; दादागिरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला अजितदादांचा टोला

पोटाकुटीच्या ओरुगल्लू येथे ही घटना घडलीय. दारूच्या नशेत ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकाने लोकांचा जीव घेतलाय. भरधाव वेगात ट्रक चालवत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. हा अपघात वारंगलच्या मामुनुर या उपनगराजवळ घडला. अचानक ब्रेक लागल्याने ट्रक पलटी झाली. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी रॉड ऑटोवर पडल्याने ७ जणांचा मृत्यू झालाय यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

हे सर्वजण ऑटोमधून दुसऱ्या गावाला जात होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. राष्ट्रीय महामार्गावर पडलेला लोखंडी रॉड जड क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात येत आहे, तर ट्रकला हटवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com