Rain, Cold Alert: दाट धुके, बोचरी थंडी...त्यात आता पाऊस, 'या' राज्यांना तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गारठा वाढणार

Rain, Cold Alert News: उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच कडाक्याची थंडी त्यात आता पावसामुळे आणखी बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Rain, Cold Alert
Rain, Cold AlertSaam Digital
Published On

Rain, Cold Alert

उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच कडाक्याची थंडी त्यात आता पावसामुळे आणखी बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढचे दोन दिवस तापमाणात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पठारी प्रदेश आणि पूर्व भारतात दाड धुके राहणार आहे.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ६-९ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पूर्व भारतात १०-१२ अंश तापमान आहे. सकाळी संपूर्ण उत्तर भारत दाट धुक्यात गायब झालेला असतो. जीथे धुक्याचे प्रमाण खूपच कमी असते अशा राज्यांनाही दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच येणाऱ्या दोन तीन दिवसात या भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rain, Cold Alert
Project Cheetah: कुनो नॅशनल पार्कमधून 'गुड न्यूज', 'आशा'ने दिला ३ पिलांना जन्म

कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १४ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. अनेक मार्गावरची वाहतूक आणि विमानांचे मार्ग देखील वळवण्यात आले आहेत.

Rain, Cold Alert
Supreme Court News: कैद्यांची जात पाहून दिलं जातं काम, सुप्रिम कोर्टातील याचिकेनंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com