सरकारने शेतकरी आंदोलनाची धास्ती घेतलीय. १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सिंघू बॉर्डरवर बंदोबस्त वाढवलाय. रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात काटेरी तार, मातीने भरलेली पोती, सिमेंट, लोखंडी बॅरिकेड्स आदी वस्तू सिंघू बॉर्डरवर आणले जात आहेत. सिंघु सीमेवर आठहून अधिक क्रेन आणि जेसीबी मशीन आणि मोठे कंटेनरही आणण्यात आले आहेत. (Latest News)
गरज भासल्यास हे कंटेनर सीमेवर उभे करण्याचीही तयारी सुरू करण्यात आलीय. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात तयारी जवळपास पूर्ण केलीय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे. इतकेच नाही तर बॉर्डरजवळील दिल्लीच्या सीमेवर बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे नीट केले जात आहेत. दिल्ली पोलिसांकडून अनेक अतिरिक्त कॅमेरेही बसवले जाताहेत. अर्धा डझनहून अधिक ड्रोनच्या साह्याने सीमाभागावरही नजर ठेवण्यात येणार आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ड्रोन चालवणाऱ्यांना बोलवलं जातं आहे. बॉर्डरजवळ पोलीस तीनपेक्षा अधिक छावण्या बनवत आहे. जेणेकरून आंदोलकांवर आणि दिल्ली सीमेवर नजर ठेवता येईल. सिंघू सीमेवर १६ कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे २५०० ते ३००० जवान तैनात करण्यात येणार आहेत. रविवारपर्यंत सुमारे शंभर पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान येथे सिंघु बॉर्डरवर दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.