Nepal bus accident : भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; ११ जण जागेवरच गेले, VIDEO

Nepal bus accident news : नेपाळमध्ये अपघाताची मोठी घटना घडली आहे. मध्य नेपाळमध्ये शुक्रवारी हा अपघात घडला आहे.
भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; ११ जण जागेवरच गेले, VIDEO
Nepal bus accident :Social Media
Published On

नवी दिल्ली : नेपाळमधून मोठी बातमी हाती आली आहे. मध्य नेपाळमध्ये शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य नेपाळमध्ये शुक्रवारी भारतीय प्रवाशांची बस मर्सियांगडी नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. तनहुन जिल्ह्यातील आयना डोंगराजवळ ही घटना घडली आहे. ४० प्रवाशांची बस कोसळल्यानंतर सशस्त्र पोलीस दलाने मदत कार्य सुरु केलं आहे. घटनास्थळी ४५ जणांचं पथक मदतीसाठी पोहोचलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घटनास्थळावरून १० ते ११ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे.

भयंकर! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली; ११ जण जागेवरच गेले, VIDEO
Train Accident Video: दारुची नशा अन् Video Call... मथुरा ट्रेन अपघाताचे धक्कादायक कारण समोर; केबिनमधील CCTV फुटेज Viral

गोरखपूरचे प्रवासी नेपाळच्या दिशेने निघाले होते. ही बस पोखरातून काठमांडूला निघाली होती. ही उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अबू खैरेनी घटनास्थळी पोहोचले आहेत.

उत्तर प्रदेशचे प्रशासकीय अधिकारी नेपाळच्या अधिकारी नेपाळच्या संपर्कात आहे. गोरखपूरच्या बसचा नेपाळमध्ये अपघात झाला आहे. या बसमध्ये उत्तर प्रदेशातील किती लोक होते, याचा शोध सुरु आहे. बस चालवणारा चालक हा गोरखपूरचा रहिवासी होता. या अपघातातून १६ प्रवाशांचा जीव वाचवण्यात आला आहे.

नेपाळच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अपघातस्थळी बचाव पथकाचं मदतकार्य सुरु आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वात नेपाळचं सैन्य दल, सशस्त्र पोलीस दलाचे जवान घटनास्थळी आहेत.

मागील महिन्यात झाली होती भीषण दुर्घटना

नेपाळमध्ये मागील महिन्यातही मोठी घटना घडली होती. भूस्खलनाच्या घटनेनंतर दोन बस त्रिशुली नदीत कोसळल्या होत्या. या घटनेत ७ भारतीयांचा मृत्यू झाला होता. बसमधील ६२ प्रवासी बेपत्ता झाले होते. या अपघातात काहींचे मृतदेह आढळले होते. या बसमध्ये १२ भारतीय नागरिक होते. काठमांडूला जाणारी एक बसचा पहाटे ३.३० वाजता घटना घडली होती. या बसमधील तिघांनी उड्या मारून जीव वाचवण्यास यशस्वी ठरले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com