NEET चा आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?

NEET Exam Row: देशातील दुसऱ्या नंबरची कठीण परीक्षा असलेल्या NEET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
NEET चा आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
Neet Exam ScamSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा ही नीट मानली जाते. पण याच परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा वादांच्या भोवऱ्यात सापडलीय. 5 मे पासूनच NEET च्या परीक्षेविषयी एकापोठापाठ एक गंभीर आरोपांची मालिका सुरु झालीय. ती मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी परीक्षेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केलीय.

वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली NEET ची परीक्षा 5 मे ला झाली आणि बिहारसह इतर राज्यातून पेपर फुटल्याचं समोर आलं. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. एवढंच नाही तर आता जाहीर झालेल्या निकालातही त्रुटी दिसून आल्याने परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप सुरु झालाय. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर एनटीएने काय उत्तर दिलंय ते जाणून घेऊ...

NEET चा आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
Nitish Kumar: नितीश-मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन

घोटाळ्याचे आरोप, एनटीएचं उत्तर

1) NEET चा कटऑफ एवढा जास्त कसा?

विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कटऑफ वाढला

2) 720 पैकी 719 आणि 718 मार्क कसे मिळाले?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एनटीए ने लॉस ऑफ टाईम आणि कॉम्पेंसेटरी मार्क दिल्याने 719 आणि 718 मार्क

3) NEET चे 6 टॉपर एकाच केंद्रावरचे कसे?

फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे दोन उत्तर बरोबर होते. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाईमचे मार्क दिले.

बिहारसह इतर राज्यातही पेपर फुट समोर आली. पण हा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं आढळून आलं नाही. ज्यांनी पेपर फोडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

NEET चा आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?
Prashant Kishor On Election: लोकसभा निकालाची भविष्यवाणी ठरली फोल; चूक मान्य करत प्रशांत किशोर यांनी केली मोठी घोषणा

देशातील सर्वात कठीण परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार आणि निकालातील घोटाळ्यांचे आरोप याचा थेट विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे पेपरफुट रोखण्यासाठी कठोर कायदा करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरु असलेला खेळ रोखायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com