4 State Assembly Election Result : PM नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ : अजित पवार

Assembly Election Result 2023 : अजित पवार यांनी म्हटलं की, तेलंगणामधील केसीआर राव महाराष्ट्रात फिरले. देशाच्या सगळ्या टीव्ही चॅनेलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट आहे.
Ajit Pawar-PM Modi
Ajit Pawar-PM ModiSaam TV
Published On

VidhanSabha Election 2023 :

देशातील ४ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाताना दिसत आहे. आतापर्यंतच्या मतमोजनीनुसार भाजप चार पैकी तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे.

भाजपच्या या विजयावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. (Latest Marathi News)

Ajit Pawar-PM Modi
Supriya Sule News: 'मी माझ्या पक्षाशी बांधील...', अजित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

अजित पवार यांनी म्हटलं की, तेलंगणामधील केसीआर राव महाराष्ट्रात फिरले. देशाच्या सगळ्या टीव्ही चॅनेलवर जाहिराती दिल्या. आताच्या निकालावरुन त्यांची परिस्थिती बिकट आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही भागात भाजपचाच विजय होईल, असं चित्र आहे. आम्ही घेतलेली भूमिका काहीना आवडली नाही. पण कोणी काही म्हटलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

आमच्या पायगुणामुळे भाजपचा विजय- मुश्रीफ

तेलंगणा सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे. मागच्या वेळी या राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. यंदाचा हा विजय म्हणजे बहुतेक हा आमचा राष्ट्रवादीचा पायगुण ठरला असावा, असे मुश्रीफ म्हणाले.

Ajit Pawar-PM Modi
Chhattisgarh Bjp CM Face: छत्तीसगडमध्ये BJP जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची होत आहे चर्चा

निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल

मध्य प्रदेश - १६५ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस ६२ मतदारसंघात आघाडीवर

राजस्थान - भाजप - १०९ आणि काँग्रेसची ७२ जागांवर आघाडी

छत्तीसगड - भाजप ५३ आणि काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर

तेलंगणा - बीआरएस ४१, काँग्रेस ६४ आणि भाजप ९ जागांवर आघाडीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com