Navy Plane Crash: अमेरिकेत नेव्हीचं विमान कोसळलं, ५ जणांचा होरपळून मृत्यू

Navy plane crash near Galveston Texas : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नेव्हीचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांचा शोध सुरू आहे.
Navy Plane Crash
Navy Plane Crash
Published On

Mexican Navy aircraft crash in the US : अमेरिकेत गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नेव्हीचे विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या विमानामध्ये एका आजारी तरुणासह सात जण होते. या दुर्घनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील टेक्सास किनाऱ्यावरील पाण्यात उर्वरित २ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातकडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात नौदलाचे ४ अधिकारीही होते. त्याशिवाय आजारी मुलगा अन् त्याच्यासोबत आणखी काही नागरिक होते. त्यातील दोघेजण मिचौ आणि माऊ फाउंडेशनचे सदस्य होते. या दुर्घटनेबाबत मेक्सिकन नौदलाने अधिकृत परिपत्रक जारी केलेय. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नेमकी संख्या निश्चित करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितलेय.

Navy Plane Crash
Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलं

नेव्हीचे विमान का कोसळलं? याबाबतची अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपास अधिकाऱ्यांकडून याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास यंत्रणा घटनास्थळाची पाहणी करत आहेत. या दुर्घटनेची चौकशी केली जात आहे, याबाबत अतिरिक्त माहिती जाहीर मिळताच जाहीर केली जाईल, असे गॅल्व्हेस्टन काऊंटीमधील सरकारी कार्यलायकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेच्या ठिकाणी जनतेने जाणे टाळावे, असेही सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलेय.

Navy Plane Crash
BMC Election : महापालिकेआधी ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी, एकाचवेळी ४०० जणांनी घेतली मशाल

दुर्घटनेचे नेमके कारण काय?

गॅल्व्हेस्टनजवळ नेव्हीच्या विमानाचा अपघात झाला. एका रूग्णाला घेऊन विमान जात होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. अपघातानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले. ही दुर्घटना नेमकी का घडली? याचा तपास केला जात आहे. पण प्राथमिक तपासानुसार दाट धुक्यामुळे ही दुर्घटना घडलेली असू शकते. मागील काही दिवसांपासून गॅल्व्हेस्टनमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. पण विमान दुर्घटनेला हे एक कारण असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मेक्सिकनमधील नेव्ही अधिकाऱ्यांकडून याबाबतचा तपास केला जात आहे.

Navy Plane Crash
Shaktipeeth Expressway : 'शक्तीपीठ'वरून 'जनकल्याण'चा मार्ग! एका टोकाला मुंबई, तर दुसऱ्या टोकाला गोवाही सुस्साट गाठता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com