नवज्योत सिंग सिद्धू कोर्टासमोर शरण; मेडिकल टेस्टनंतर तुरुंगात होणार रवानगी

Navjyot Singh Sidhu surrenders to Patiala court : मात्र, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे सिद्धू यांना कोर्टाला शरण येण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.
Navjyot Singh Sidhu surrenders to Patiala court
Navjyot Singh Sidhu surrenders to Patiala courtSaam Tv
Published On

नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे पटियाला कोर्टाला शरण गेले आहे. थोड्यात वेळात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची तुरुंगात (Jail) रवानगी होणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. (Navjyot Singh Sidhu surrenders to Patiala court; He will be sent to jail after medical examination)

हे देखील पाहा -

नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सिद्धू यांनी शरणागतीतून सुटका होण्याच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सिद्धू आज पतियाला कोर्टात शरण आले. त्यांनी शाररिक समस्येचे कारण देत शरणागतीसाठी वेळ द्यावा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे सिद्धू यांना कोर्टाला शरण येण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.

Navjyot Singh Sidhu surrenders to Patiala court
नरेंद्र मोदींच्या कामामुळे भारत आर्थिक श्रेणीत अग्रेसर - राजनाथ सिंह

नेमकं काय आहे प्रकरण?

पतियाळा येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते. या भांडणामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com