New Delhi: देशात येणाऱ्या काळात उष्णतेची लाट उसळणार आहे . तर देशात तापमानात वाढ होणार आहे. बदलत्या तापमानामुळे हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील ३-४ दिवस बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पश्चिम हिमालय क्षेत्र आणि आसपासच्या मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मध्य आणि पूर्व भारतातील काही भागात कमाल तापमान ३९-४२ डिग्री सेल्सिअस असणार आहे. तसेच उत्तर पश्चिमी भारतातील काही भाग, पश्चिम बंगालच्या काही भाग, ओडिशातील काही भाग, आंध्र प्रदेश , केरळ, जम्मू, पंजाब आणि उत्तर भारतात तापमान हे सामान्यपेक्षा ३-५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक असणार आहे.
पुढील २-३ दिवसात आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळच्या काही भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा २-४ डिग्री सेल्सिअस अधिक राहण्याची शक्यता आहे.
या राज्यात पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आजपासून ते १९ तारखेच्या रात्रीपर्यंत पश्चिमी हिमालय क्षेत्रात विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंढिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थान, पश्चिम हिमालय क्षेत्रात १७-१९ एप्रिल भागात दमदार पावसाची शक्यता आहे. आजपासून ते १९ एप्रिलपर्यंत ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत तापमान ४२ डिग्री सेल्सियस पार गेलं आहे. शनिवारी दिल्लीत सर्वाधिक तापमान होतं. तर पुढील आठवड्यात पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.